JOIN US
मराठी बातम्या / देश / महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; शेकडो मजुरांनी एकत्र येऊन व्यक्त केला आक्रोश

महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; शेकडो मजुरांनी एकत्र येऊन व्यक्त केला आक्रोश

यापूर्वी मुंबईतील वांद्रे स्थानकाजवळ मोठ्या संख्येने मजूर एकत्र जमा झाले होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सुरत, 28 एप्रिल : कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त इतर सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यातच गुजरातमधील (Gujrat) सुरत येथून एक धक्क्दायक बाब समोर आली आहे. सुरतमधील डायमंड बोर्स कार्यालयाच्या बाहेर मजुरांनी निषेध व्यक्त केला. यावेळी मजुरांनी दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे. लॉकडाऊन असतानाही त्यांच्याकडून काम करवून घेतलं जात आहे, असा त्यांचा आरोप आहे. याशिवाय आपल्या गावी रवानगी करण्यात यावी, अशी मागणी मजुरांकडून केली जात आहे. यावेळी शेकडो संख्येने मजुर एकत्र जमा झाले होते. यामुळे सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी झाली होती.

संबंधित बातम्या

लॉकडाऊनमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. काम बंद असल्याने मजुरांना भविष्याची चिंता सतावत आहे. इतकच नाही तर परराज्यात काम करणारे अनेक मजुर प्रतिकूल परिस्थितीत विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईतील वांद्रे स्थानकाजवळ याचा उद्रेक पाहायला मिळाला. हजारो संख्येने मजुर एका ठिकाणी जमा झाल्याने सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी झाली होती. संबंधित- कोरोनाग्रस्तांसाठी TikTok ची सरकारला मोठी मदत, उद्धव ठाकरेंनी मानले आभार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या