मुंबई, 28 एप्रिल : देशात सध्या जर कशाची चर्चा असेल तर ती कोरोना व्हायरस आणि TikTokची आहे. याच TikTok ने देशावरील संकटाच्या काळात मोठा मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी टिकटॉक आणि बाईट डान्सने मुख्यमंत्री सहायता निधीला तब्बल 5 कोटींची मदत केली आहे. बरं इतकंच नाही तर महाराष्ट्र पोलिसांसाठी एक लाख मास्कचा पुरवठा टिकटॉकडून करण्यात आला आहे. आपल्या देशावर आणि राज्यावर आलेल्या या संकाटाला मदतीची साथ दिल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टिकटॉक कंपनीचे आभार मानले आहे. यासंबंधी महाराष्ट्र डीजीआयपीआर विभागाकडून ट्वीटसुद्धा करण्यात आलं आहे. खरंतर भारतात सगळ्या सोशल माध्यमांना मागे टाकत टिकटॉक पहिल्या नंबरवर आहे. सध्या देशात सगळ्यात जास्त कमाई टिकटॉकमधून होते असंही म्हणायला हरकत नाही.
जगभरात टिकटॉक वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मनोरंजनाचं एक उत्तम साधण म्हणून टिकटॉककडे पाहिलं जातं. टिकटॉक कंपनीने केलेल्या मदतीमुळे सर्वस्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे.