JOIN US
मराठी बातम्या / देश / रेल्वे लवकरच घेणार मोठा निर्णय, 12 मेपासून या शहरांतून पॅसेंजर ट्रेन धावण्याची शक्यता

रेल्वे लवकरच घेणार मोठा निर्णय, 12 मेपासून या शहरांतून पॅसेंजर ट्रेन धावण्याची शक्यता

11 मेपासून ऑनलाइन बुकिंग सुरू होऊ शकते. त्यामुळे विविध राज्यांमध्ये अडकलेल्यांना यामुळे मोठी मदत मिळणार आहे.

जाहिरात

मंगळवारी खासगी रेल्वेसाठी लिलाव करण्यापूर्वी कंपन्यांसह पहिल्या बैठकीत 16 कंपन्या सहभागी झाल्या. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यात बॉम्बर्डिअर, कॅप इंडिया, आय-स्कायर कॅपिटल, IRCTC, BHEL, स्टर लाइट, मेधा, वेदांता, टेटला गर, BEML आणि RK असोसिएशन यांचा सहभाग आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 मे : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत आहे. अशा परिस्थितीत सध्या देशात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू आहे. रेल्वे मंत्रालय पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. काही शहरांमधून विशेष रेल्वे सुरू होऊ शकते. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून विविध राज्यांमध्ये अडकलेल्यांना मोठी मदत मिळू शकते. Indian Railways plans to gradually restart passenger train operations from 12th May, initially with 15 pairs of trains (30 return journeys): Ministry of Railways pic.twitter.com/kCj5b3GDaV

संबंधित बातम्या

जाहिरात

एएनआय या वृत्तसंस्थेने केलेल्या ट्विटनुसार भारतीय रेल्वे 12 मे पासून पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याचा विचार करीत आहे. यानुसार टप्प्याटप्प्याने रेल्वे सुरू करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राथमिक पातळीवर 30 रिटर्न ट्रेन सुरू होतील. या विशेष ट्रेन म्हणून चालविल्या जातील. नवी दिल्ली, दिलबर्गा, आगरताळा, हावडा, पटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, तिरुअनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद, जम्मू या प्रमुख स्थानकांपर्यंत रेल्वे जाणार आहेत. यासाठी 11 मेपासून सायंकाळी 4 वाजल्यापासून ऑनलाइन बुकिंग सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हे बुकिंग IRCTC च्या वेबसाइटवर ऑनलाइन करण्यात येईल. तिकीट खिडकी सुरू नसणार असेही सांगितले जात आहे. याशिवाय प्रोटोकॉल नियमाचे पालन करणे अनिवार्य आहे. संबंधित - शहीद मुलाच्या आठवणीत उभारलं स्मारक; आजही त्याला पाहून आईला फुटतो मायेचा पाझर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या