Home /News /national /

शहीद मुलाच्या आठवणीत उभारलं स्मारक; आजही त्याला पाहून आईला फुटतो मायेचा पाझर

शहीद मुलाच्या आठवणीत उभारलं स्मारक; आजही त्याला पाहून आईला फुटतो मायेचा पाझर

लेक शहीद झाल्याची बातमी जेव्हा आईच्या कानावर आली तेव्हा ती वेड्यासारखी रडत होती. पोटचा गोळा कायमचा दुरावला ही भावना तिला सहन होत नव्हती.

    जशपूर, 10 मे : आज मदर्स डे (Mother's Day) आहे, आपल्या शहीद मुलाच्या आठवणीत एका आईने त्याचं स्मारक उभारल्याची एक कहाणी आज तुम्हाला सांगणार आहोत. लहानापासून मोठं करणाऱ्या आईचं प्रेम आपल्याला कधीच कळू शकत नाही. कारण ते कोणत्याही मर्यादेच्या पलीकडचं असतं. आईची माया काय असते हे या एका फोटोतून समोर येते. हा फोटो छत्तीगडमधील जशपूर जिल्ह्यातील आहे. या आईने आपल्या लेकाला देशसेवेसाठी पाठवलं. जेव्हा लेक शहीद झाला तेव्हा तिला स्वत:ला आवरता आलं नाही. धाय मोकलून आई रडत होती. पोटच्या गोळ्याला आपल्यापासून कायमचं दूर जाणं तिला सहन होत नव्हत. शेवटी आईने त्याचं स्मारक उभारलं. आजही रोज सकाळ-संध्याकाळ ती मुलाच्या पुतळ्याचे लाड करते. त्याची संपूर्ण काळजी घेते. आईकडून दूर असूनही शहीद मुलगा आपल्या आईच्या खूप जवळ आहे. जशपूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहणारी निर्मला टोप्पो आणि वडील फिरोद टोप्पो यांच्यासाठी मुलाचे स्मारक त्यांच्या जगण्याचा आधार बनला आहे. शहीद बसील हे 2011 मध्ये बस्तरमधील जिल्हा पोलीस पथकात तैनात होता. ऑगस्ट 2011 मध्ये नक्षलवाद्यांनी त्यांच्या वाहनांला सुरुंग लावला आणि अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये बसील टोप्पो शहीद झाले. या घटनेनंतर शहीद बसील यांच्या आईला जबरदस्त धक्का बसला होता. सतत त्या मुलाच्या आठवणीत रडत राहायच्या. मुलावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर आईने शहीद मुलाचं स्मारक उभारण्याचा विचार केला. त्यानंतर ओदिसा आणि कलकत्ता येथील कलाकारांच्या मदतीने शहीद बसील यांचा पुतळा गावात तयार करण्यात आला. आईचं प्रेम वेडं असतात असत म्हणतात. आपल्या लेकाचा पुतळा तयार करुन ती त्याच्यावर प्रेम करत, त्याचे लाड करते. तिला माहितीये की मुलगा आता परत येणार नाही. यासाठी तिने मुलाचा पुतळा तयार केला आणि त्याच्या आधारावर ती पुढे चालत आहे. संबंधित-ना आई ना नातलग; बापाच्या मृतदेहासमोर एकटा बसून होता 10 वर्षांचा चिमुरडा मजुरांच्या मृत्यूचं सत्र थांबेना, उष्णतेमुळे 3 जणांनी वाटेतच गमावला जीव
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या