JOIN US
मराठी बातम्या / देश / कोरोना संसर्गामुळे मृत्यू ओढावलेल्या व्यक्तीबाबत सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

कोरोना संसर्गामुळे मृत्यू ओढावलेल्या व्यक्तीबाबत सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

मृत रुग्णाचे साहित्य हॉस्पिटलमधून गायब झाल्यास त्याला संबंधित नर्सिंग ऑफिसर जबाबदार राहणार

जाहिरात

प्रातिनिधिक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 13 जून: कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत अनेकांना प्राण गमावावे लागले आहेत. मात्र, मृतांचे साहित्य हॉस्पिटलमधून गायब होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. आता यावर सरकारने उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. आता मृत रुग्णाचे साहित्य हॉस्पिटलमधून गायब झाल्यास त्याला संबंधित नर्सिंग ऑफिसर जबाबदार राहणार असून त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. हेही वाचा..  चांगली बातमी: महाराष्ट्रात कमी पैशांमध्ये होणार ‘COVID-19’ची टेस्ट, जाणून घ्या! आपल्या प्रियजनांना गमावल्याच्या वेदनेपासून दु:खी लोक त्या व्यक्तीशी संबंधित असलेल्या वस्तूंपासून देखील दूर जात आहेत. अशा अनेक तक्रारी प्राप्त देशातील विविध रुगालयातून येत आहे. राजधानी दिल्लीत देखील याच प्रकारच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. त्यानंतर दिल्ली सरकारनं अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे. लोकनायक रुग्णालय प्रशासनाच्या वतीने प्रभागात तैनात असलेल्या नर्सिंग अधिकाऱ्यास यासंदर्भात जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रुगालयातील सूत्रांनी सांगितलं की, कोरोनाच्या संसर्गामुळे जिवावर बेतलेल्या अनेक रूग्णांची कुटुंबे आपले सामान घेण्यासाठी येत आहेत. परंतु त्यांना मृत कुटुंबातील सदस्यांचा सामान मिळत नाही. कुटुंब गमावण्याच्या वेदनेमुळे आणि कोरोनाच्या भीतीमुळे बरेच लोक सामान न घेता परत जात आहेत. परंतु असे बरेच लोक आहेत ज्यांनी रुग्णालय प्रशासनाकडे सामान हरवल्याची तक्रार केली आहे. कोरोना वॉर्डातून सतत मृत व्यतीचे सामान न मिळाल्याबद्दल रुग्णालय प्रशासनाने गंभीर भूमीका घेतली आहे. आता यासाठी मृतांच्या वस्तूंचे पॅकेट बनवले जाणार आहे. रुग्णालय प्रशासनाच्या आदेशानुसार आता कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्या वॉर्डातील नर्सिंग ऑफिसरने रुग्णाच्या मृत्यूनंतर ताबडतोब सॅनिटायझेशन करून पॅकेट बनवावे लागेल. त्या पॅकेटमध्ये सर्व माहिती असेल. पॅकेटवर रुग्णाचे नाव, पत्ता आणि संख्या देखील लिहावा लागेल. हे पॅकेट बनल्यानंतर रुग्णालयात उपस्थित सुरक्षा अधिकाऱ्याला ते द्यावे लागेल. हे सुरक्षा अधिकारी मृतांच्या वस्तूंचे रक्षण करतील. तसेच त्यांची संपूर्ण नोंद ठेवतील. जेणेकरुन एखाद्याच्या कुटूंबातील वस्तू घेण्यासाठी आला तर सुरक्षा अधिकारी त्यांचे सामान त्यांना देऊ शकणार आहे. हेही वाचा..  मनसे नेत्यानं सरकारला सांगितला महसुलातील तूट भरून काढण्यासाठी ‘नवा फॉर्म्युला’ कोणाचाही सामान शिल्लक राहिल्यास, सुरक्षा अधिकारी त्यांच्याशी संपर्क साधतील आणि त्यांना सामान ठेवण्यास सांगितले जाईल. या व्यवस्थेखाली कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीचे सामान गायब झाले, त्या वॉर्डात उपस्थित असलेल्या नर्सिंग ऑफिसरची जबाबदारी असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या