Home /News /national /

चांगली बातमी: महाराष्ट्रात सर्वात कमी पैशात होणार ‘COVID-19’ची टेस्ट, जाणून घ्या दर!

चांगली बातमी: महाराष्ट्रात सर्वात कमी पैशात होणार ‘COVID-19’ची टेस्ट, जाणून घ्या दर!

देशात आत्तापर्यंत 4,43,37,201 टेस्टिंग झाल्या आहेत

देशात आत्तापर्यंत 4,43,37,201 टेस्टिंग झाल्या आहेत

राज्यात खासगी प्रयोगशाळा कोरोना चाचणीसाठी 4500 रुपये आकारत होते. घरी जाऊन स्वॅब घेतला त्यासाठी पीपीई कीटचा वापर यामुळे 5200 रुपये आकारले जात होते.

मुंबई 13 जून: राज्यातील खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी आता जास्तीत जास्त 2200 रुपये इतका दर आकारला जाणार आहे. तर रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी 2800 रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. सर्वसामान्य रुग्णांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाने चार सदस्यांची समिती गठीत केली होती. समितीने शासनाला अहवाला सादर केला असून त्यांच्या शिफारशीनुसार दरनिश्चित करण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्य आरोग्य हमी सेवा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुल्क निश्चिती समिती गठीत केली होती. या समितीला आठवडाभराचा कालावधी देण्यात आला होता. निर्धारीत केलेल्या कालावधीत समितीने आपला अहवाल सादर करून सामान्यांना दिलासा दिल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती देतांना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, राज्यात खासगी प्रयोगशाळा कोरोना चाचणीसाठी 4500 रुपये आकारत होते. घरी जाऊन स्वॅब घेतला त्यासाठी पीपीई कीटचा वापर यामुळे 5200 रुपये आकारले जात होते. मात्र समितीने केलेला अभ्यास आणि काढलेल्या निष्कर्षावरून आता राज्यात कोरोना चाचणीसाठी जास्तीत जास्त 2200 रुपये आकारले जातील. भारतात कोरोनाचं कम्युनिटी ट्रान्समिशन झालं, तज्ज्ञांनी खोडला सरकारचा दावा तर घरी जाऊन केलेल्या चाचणीसाठी 2800 रुपये आकारले जातील. संपूर्ण देशात एवढे कमी शुल्क अन्यत्र कुठेही नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. या दर निश्चितीमुळे सामान्यांना दिलासा मिळणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. देशात महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वाधीक चाचण्या केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी कोरोना पॉझिटिव्ह सध्या राज्यात सध्या 53 शासकीय आणि 42 खाजगी अशा एकूण 95 प्रयोगशाळा कार्यरत आहेत. मुंबईमध्ये सर्वाधिक चाचण्या झाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच चाचण्या होत असून त्यात कुठलीही तडजोड केली जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संपादन - अजय कौटिकवार
Published by:Priyanka Gawde
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या