JOIN US
मराठी बातम्या / देश / एकावेळेला 25-30 पोळ्यांचा सुरु आहे खुराक, तबलिगी सदस्यांच्या खाण्याच्या मागणीमुळे रुग्णालय कर्मचारी त्रस्त

एकावेळेला 25-30 पोळ्यांचा सुरु आहे खुराक, तबलिगी सदस्यांच्या खाण्याच्या मागणीमुळे रुग्णालय कर्मचारी त्रस्त

मागणी पूर्ण न केल्याने यांच्यातील एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वॉर्डमध्ये थुंकत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे

जाहिरात

New Delhi: Police use a drone to keep a vigil on the area as people who attended Tabligh-e-Jamaat congregation in Nizamuddin West walk to board a bus for the LNJP Hospital for screening and COVID-19 test, in New Delhi, Tuesday, March 31, 2020. 24 people who took part in the congregation have tested COVID-19 positive. (PTI Photo) (PTI31-03-2020_000089B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

डेहराडून, 5 एप्रिल : दिल्लीतील तबलिगी जमातमध्ये (Tabligi Jamat) सहभागी झालेल्या काही सदस्यांना डेहराडूनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र इतर रुग्णालयांप्रमाणे ते येथेही गोंधळ घातल आहे. हे सदस्य रुग्णालयातील डॉक्टरांकडून विविध मागणी करीत असतात आणि त्यांची मागणी पूर्ण न केल्यास रुग्णालयात गोंधळ घातल असल्याची माहिती तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दिली आहे. रुग्णालयात दाखल झालेले हे सदस्य रुग्णालयात 25 ते 30 पोळ्या खात आहेत. सर्वसाधारणपणे रुग्णालयात जेवणात प्रत्येक रुग्णाला 4 पोळ्या, भाजी आणि वरण-भात दिला जातो. येथे मात्र ते एकावेळेत 25 ते 30 पोळ्या खात असल्याने रुग्णालय व्यवस्थापनाच्या नाकी नऊ आले आहेत. देशात कोरोना पॉझिटिव्ह (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात 3000 चा रुग्णसंख्येचा टप्पा पार केला आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे. त्यात दिल्लीतील निजामुद्दीन तबलिगी मरकझच्या कार्यक्रमामुळे देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तबलिगीच्या सदस्यांमुळे त्रस्त उच्च पदावरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दून रुग्णालयात तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेले तब्बल 28 जण येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापैकी 5 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या रुग्णांच्या बेशिस्तपणामुळे ड़ॉक्टरांसह संपूर्ण वैद्यकीय कर्मचारी त्रस्त आहेत. अनेक तर जेवणाची व चहाची मागणी करीत डॉक्टरांना त्रास देतात. नवभारत टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. संबंधित -  पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेणार, मनमोहनसिंग आणि सोनियांना केला फोन मागणी पूर्ण केली नाही म्हणून रुग्णालयात थुंकले वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील दाखल असलेला एक कोरोनाबाधित रुग्ण रुग्णालयातील वॉर्डमध्ये थुंकत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्यांना समजावत शांत केले. याशिवाय दररोज एखादा सदस्य चहा कपमध्ये देण्याऐवजी मोठ्या ग्लासात देण्याची किंवा इतक खाद्यपदार्थांची मागणी करीत कर्मचारी व डॉक्टरांना त्रास देतात. त्यामुळे येथील डॉक्टरांना तबलिगीच्या सदस्यांची मागणी पूर्ण करीत असताना नाकी नऊ आले आहेत. संबंधित -  4 तास झोप, 9 तासांचा प्रवास, कस्तुरबातील कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या