4 तास झोप, 9 तासांचा प्रवास...कोरोना विरोधात लढणाऱ्या कस्तुरबातील कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम

4 तास झोप, 9 तासांचा प्रवास...कोरोना विरोधात लढणाऱ्या कस्तुरबातील कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम

येथील अनेक कर्मचारी शहापूरपासून 20 किमी आत खेड्यांमध्ये राहतात. लॉकडाऊनच्या काळातही ते हा प्रवास कसा करत असतील?

  • Share this:

मुंबई, 5 एप्रिल : देशभरात कोरोनाच्या (Covid - 19) रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित (Coronavirus) आहेत. काल आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार केवळ मुंबई 377 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दिवस-रात्र काम करावं लागत आहे.

मुंबईतील कस्तुरबा (Mumbai Kasturba Hospital) रुग्णालयात कोरोना संशयित व बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहे. त्यासाठी येथील वैद्यकीय कर्मचारी व डॉक्टर यांना दिवस-रात्र काम करावे लागत आहे. मात्र लॉकडाऊनदरम्यान वाहतूक व्यवस्था बंद असल्याने लांब राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा प्रवास करुन रुग्णालय गाठावं लागत आहे. कस्तूरबा रुग्णालयात शहापूरहून येणाऱ्या 8 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना तब्बल 9 तासांचा प्रवास करावा लागत आहे.

संबंधित - 62 वर्षीय नाहरु खान यांनी 48 तासांत बनवलेली सॅनिटायजेशन मशीन हॉस्पिटलला केली दान

रुग्णालय प्रशासनाकडून काही ठिकाणी वाहतुकीची व्यवस्था केली आहे. मात्र या बसची सोय केवळ विरार, कल्याण, बदलापूर इथपर्यंतच सीमित आहे. मात्र शहापुरपासून 20 किमी आत खेड्यांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना लिफ्ट मागून प्रवास करावा लागत आहे.

सकाळच्या शिफ्टवरील कर्मचाऱ्यांना पहाटे 4 वाजता घर सोडावं लागतं. खेड्यातून तालुक्यात येणाऱ्या एखाद्या बाईकस्वाराला विनंती करीत शहापूर एसटी डेपो गाठतात. या ठिकाणी दुसरी एसटी पकडून ठाणे डेपोत येतात. ठाण्याच्या तीन हात नाका किंवा कोपरीवरुन बीएसटी पकडून सायन सर्कलपर्यंत येतात. पुढे असं करत कस्तुरबा रुग्णालय गाठतात. या रुग्णालयातील वॉर्डबॉय आणि आया अशा 8 जणांना हा 9 तासांचा प्रवास करावा लागत आहे. मात्र कोरोनाविरोधातील लढा जिंकण्यासाठी प्रामाणिकपणे ते आपलं काम करीत आहेत.

संबंधित - कोरोनावर करता येईल मात, लष्करासाठी शस्त्र तयार करणाऱ्यांनी बनवले खास व्हेंटिलेटर

First published: April 5, 2020, 3:56 PM IST

ताज्या बातम्या