JOIN US
मराठी बातम्या / देश / घरी जाताना भावुक झाले तबलिगी जमाती; म्हणाले, डॉक्टरांनी आई-बापाप्रमाणे घेतली काळजी

घरी जाताना भावुक झाले तबलिगी जमाती; म्हणाले, डॉक्टरांनी आई-बापाप्रमाणे घेतली काळजी

डिस्चार्ज दिलेल्या या तबलिगींमध्ये 6 जणं हे नाशिक जिल्ह्यातील आहेत

जाहिरात

तबलिगी जमातीच्या मार्गदर्शनाखाली या जमातीतील लोक देशांच्या वेगवेगळ्या भागात जाऊन इस्लामचं ज्ञान आणि इस्लाम आचरणात आणण्याचे शिक्षण देतात.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मेरठ, 27 एप्रिल : कोरोनाच्या (Coronavirus) संकटात जगातील प्रत्येक व्यक्तीला चटके सहन करावे लागत आहे. या कोरोनाग्रस्तांमध्ये (Covid - 19) तबलिगी जमातशी (Tabligi Jamat) संबंधित अनेकांचा समावेश आहे. जमातींवर या दरम्यान आजार पसरवण्याबाबत अनेक आरोप लागले आहेत. अनेक ठिकाणांहून जमातच्या लोकांद्वारा वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत गैरव्यवहारच्या तक्रारीदेखील समोर आल्या होत्या. मात्र मेरठमध्ये (Meerut) वेगळेच चित्र दिसून येत आहे. मेरठमध्ये पांचली खुर्द कोविड रुग्णालयात भरती असलेल्या जमातसंबंधित 12 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून बाहेर पडण्यापूर्वी या लोकांना डॉक्टरांचे आभार व्यक्त केले आहेत. हे वाचा - कॅन्सरचं काय कोरोनासमोरही मानली नाही हार; 4 वर्षांच्या चिमुरडीचा लढा यशस्वी डॉक्टरांनी मुलांप्रमाणे त्यांची काळजी घेतली बरे झालेल्या 12 जमातींपैकी 2 जण मवाना, 2 परीक्षितगढ आणि 2 बागपत येथे रवाना झाले. नाशिकमध्ये राहणाऱ्या 6 जमातींना लॉकडाऊन असल्याकारणाने नॅशनल इंटर कॉलेज क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठविण्यात आले. बरे झालेल्या जमातींनी डॉक्टरांच्या टीमचे आभार मानले आहे. एका जमातीने तर भावूक होत डॉक्टरांची तुलना आई-बापाशी केली आहे. ते म्हणाले रुग्णालयात डॉक्टरांनी एखाद्या मुलाप्रमाणे काळजी घेतली. येथे आम्हाला काहीच त्रास झाला नाही. पाचली खुर्द कोविड रुग्णालयाचे नोडल डॉक्टर पीके गौतम यांनी सांगितले की, पंचली खुर्दच्या रुग्णालयात आता फक्त 4 रुग्ण  आहेत. यातील 3 उद्या डिस्चार्ज होण्याची शक्यता आहे. मेरठमधील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या जास्त आहे. संबंधित - भूक नाही, स्वाभिमान मोठा! आदिवासींनी नाकारलं मोफत रेशन; म्हणाले, आधी काम द्या माऊलीने केलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक; म्हणाला, उद्धव ठाकरे लय भारी!  

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या