टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.
सुरत, 26 जानेवारी : गुजरात राज्यातील सुरत येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर सध्या या बातमीनं धुमाकूळ घातला आहे. गुजरातमध्ये एका लग्नात नवऱ्याच्या वडिलांनी लग्नाच्या आधी वधूच्या आईला पळवून नेले. त्यानंतर त्या दोघांनी विवाहही केला. असे म्हटले जाते की मुला-मुलींचे आई-बाबा एकमेकांना महाविद्यालयीन काळापासून ओळखत होते. दरम्यान आई-बाबाच गायब झाल्यामुळं वर आणि वधूचे लग्नही थांबवण्यात आले. फेब्रुवारीच्या दुसर्या आठवड्यात दोघांचे लग्न करणार होते. परंतु 48 वर्षीय पुरुष आणि 46 वर्षीय महिलेच्या गायब झाल्यामुळे हे प्रकरण आणखी काही काळ रखडू शकते. इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुलाचे वडील कतारगाम येथून बेपत्ता झाले होते, तर ती महिला नवसारीतून बेपत्ता आहे. हे दोघे पळून गेले असल्याची भीती दोघांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. दोन्ही कुटुंबासाठी हा लाजीरवाणा प्रकार होता. दोन्ही कुटूंबियांनी पोलिसांत गायब झाल्याचे वृत्त नोंदवले आहे. वाचा- कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ महिलेवर सामूहिक बलात्कार, मुंबई हादरली गायब होण्याच्या घटनेने लोकांना केले हैराण मिळालेल्या माहितीनुसार वधू-वर आपल्या लग्नाची तयारी करत होते. एका वर्षापूर्वी दोघांचा साखरपूडा झाला होता. दोघेही एकाच समाजातील असून कुटुंबीयांनीही या नात्याला सहमती दर्शविली. मात्र लग्नाच्या जवळपास महिनाभरापूर्वीच दोन्ही पालकांचे बेपत्ता झाल्याच्या घटनेने लोकांना हैराण केले आहे. मुलाचे वडील राकेश (नाव बदलले आहे) कापड आणि जमीन या व्यवसायात आहेत. 10 जानेवारीपासून बेपत्ता राकेश हा एका राजकीय पक्षाचा सदस्यही आहे. त्याला वधूची आई स्वाती (नाव बदललेले) यांना आधीपासून ओळख होते. दोघेही कटारगाम परिसरातील शेजारी आणि चांगले मित्र होते. वाचा- आसमान से टपका और खजूर मे अटका, रात्रभर त्याच्या डोक्यावरुन रेल्वे जात राहिली हिरा कारागिरांच्या घरात झाले होते वधूच्या आईचे लग्न या दोन कुटुंबातील एका नातेवाईकाने सांगितले की ते दोघे एकाच समाजात वास्तव्यापासून एकमेकांना ओळखत होते. त्याच्या काही निकटवर्तीयांनी आम्हाला सांगितले आहे की यापूर्वीही दोघांचे संबंध होते. स्वातीने मात्र, नवसारी येथील एका व्यक्तीशी लग्न केले, ज्यांचे नंतर त्याने लग्न केले. ‘स्वातीचे कुटुंब मूळचे भावनगर जिल्ह्यातील आहे. स्वाती हिरे कारागीरानं लग्न केलं होतं ज्याने नंतर दलाल म्हणून काम करण्यास सुरवात केली. सोशल मीडियावर अशाप्रकारे महिला आणि पुरुषांच्या गायब होण्याची चर्चा आहे आणि त्यांची छायाचित्रेही शेअर केली जात आहेत. वाचा- तान्हाजी-भाजप व्हिडीओवर खा. संभाजीराजे भडकले, मोदी सरकारला दिला थेट इशारा