JOIN US
मराठी बातम्या / देश / Divorce साठी 6 महिने वाट पाहण्याची गरज नाही, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Divorce साठी 6 महिने वाट पाहण्याची गरज नाही, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

आता घटस्फोट मिळण्यासाठी 6 महिन्याची वाट पाहावी लागणार नाही. जर लगेच घटस्फोट हवा असेल तर त्यासाठी सुप्रीम कोर्टाने अट ठेवली आहे.

जाहिरात

घटस्फोटावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली : घटस्फोट म्हटलं की हजार भानगडी, कोर्टाच्या तारखा 6 महिन्यांचा काउन्सिलिंगसाठी असलेला वेळ आणि ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ आणि होणारा मनस्ताप यातून आता बऱ्याच जणांची सुटका सुप्रीम कोर्टाचा या एका निर्णयामुळे होणार आहे. घटस्फोट म्हटलं की नको बाबा असं वाटायचं पण पर्याय नसेल तर या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय काही तो लवकर तसाही मिळत नव्हता. सगळ्या अडचणी आणि प्रश्न लक्षात घेता नुकत्याच एक केसचा निकाल देताना सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. आता घटस्फोट मिळण्यासाठी 6 महिन्याची वाट पाहावी लागणार नाही. जर लगेच घटस्फोट हवा असेल तर त्यासाठी सुप्रीम कोर्टाने अट ठेवली आहे. त्याची पूर्तता करणाऱ्याला लगेच घटस्फोट मिळेल.

‘अनेकांना मुख्यमंत्री व्हायची स्वप्न पडतायत, पण…’, शिंदेंनी एका वाक्यात संपवला विषय!

जर पती-पत्नीचे नाते इतके बिघडले असेल त्याला काउन्सिलिंग करूनही ते नीट होणार नसेल, तर न्यायालय भारतीय राज्यघटनेच्या कलम 142 नुसार घटस्फोट देऊ शकते. यासाठी त्यांना कौटुंबिक न्यायालयात जावे लागणार नाही, तसेच घटस्फोटासाठी ६ महिने वाट पाहावी लागणार नाही. 2014 मध्ये दाखल शिल्पा शैलेश विरुद्ध वरुण श्रीनिवासन खटल्यात हा निकाल आला, ज्याने भारतीय संविधानाच्या कलम 142 नुसार घटस्फोटाची मागणी केली होती. याचा निकाल देताना हा महत्त्वपूर्ण देण्यात आला आहे. नवरा बायको दोघंही जर घटस्फोटासाठी तयार असतील तर त्यांना लगेच घटस्फोट मिळू शकतो.

‘राष्ट्रवादीची भाजपसोबत बोलणी सुरू’, वज्रमूठ सभा सुरू असताना काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट

कायद्याच्या दृष्टिकोनातून विवाह म्हणजे मजेची गोष्ट नाही. ज्यामध्ये 1 किंवा 2 महिने एकत्र राहिल्यानंतर घटस्फोट घ्या. यामध्ये दोन कुटुंबांच्या भावना गुंतलेल्या आहेत. तुम्ही लग्नाच्या कमीत कमी एक 1 वर्षानंतरच घटस्फोटासाठी अर्ज करू शकता.

संबंधित बातम्या

घटस्फोटाचेही दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात विवादित घटस्फोट म्हणजे परस्पर संमतीशिवाय हा घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला जातो. दुसरा प्रकार म्हणजे एकमेकांच्या संमतीने घेतला जाणारा घटस्फोट आहे.

कोणत्या कारणांसाठी घेऊ शकता घटस्फोट? एडल्ट्री घरगुती हिंसाचार धर्म परिवर्तनासाठी जबरदस्ती केल्यास मानसिक आरोग्य ठिक नसल्यास कुष्ठ रोग असेल तर HIV, STD सारखे आजार असतील तर घटस्फोट घेता येतो संन्यास घ्यायचा असेल तर आणि शेवटचं कारण म्हणजे 7 वर्षांपेक्षा जास्त काळ पर्टनर बेपत्ता असेल तरी देखील घटस्फोटासाठी अर्ज करता येतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या