जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'अनेकांना मुख्यमंत्री व्हायची स्वप्न पडतायत, पण...', शिंदेंनी एका वाक्यात संपवला विषय!

'अनेकांना मुख्यमंत्री व्हायची स्वप्न पडतायत, पण...', शिंदेंनी एका वाक्यात संपवला विषय!

मुख्यमंत्रिपदावरून महाविकासआघाडीत रेस, शिंदेंचा टोला

मुख्यमंत्रिपदावरून महाविकासआघाडीत रेस, शिंदेंचा टोला

मुख्यमंत्रिपदावरून महाविकासआघाडीमध्ये सुरू असलेल्या वक्तव्यांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निशाणा साधला आहे.

  • -MIN READ Thane,Maharashtra
  • Last Updated :

अजित मांढरे, प्रतिनिधी ठाणे, 1 मे : महाविकासआघाडीची वज्रमूठ सभा मुंबईत पार पडली. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी बारसू, आरे मेट्रो कारशेड तसंच बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला. बारसू रिफायनरी प्रकल्पावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे कोकणात आले तर त्यांना कोकणातून पळवून लावू असा धमकीवजा इशारा त्यांनी दिला होता. राणेंचं हेच आव्हान ठाकरेंनी स्वीकारलंय. मी येत्या 6 तारखेला बारसूला जाणार आणि त्या ठिकाणी बोलणार, तुम्ही मला कोण अडवणारे? असा सवाल ठाकरेंनी विचारला. ठाकरेंच्या पत्रावरुन निशाणा साधणाऱ्या सत्ताधाऱ्यांनाही ठाकरेंनी सुनावलंय. बारसूची जागा सुचवली होती. मात्र तिथे पोलीस पाठवून लाठीमार करा असं लिहिलं होतं का असा सवालही त्यांनी विचारला. मात्र सर्वमान्यता मिळाल्यास बारसू रिफायनरीला विरोध नसल्याचंही ठाकरेंनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्रापासून मुंबई तोडणाऱ्यांचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही, मग तो कोणीही असो असा इशाराही ठाकरेंनी दिला. तसंच केंद्र आणि राज्य सरकारचा ठाकरेंनी समाचार घेतला.

मुख्यमंत्र्यांचा पलटवार दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. निवडणुका आल्या की मुंबई तोडणार असं बोललं जातंय. पण जे मुंबईला तोडण्याची भाषा करत आहेत, त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. आम्ही आरोपांना कामातून उत्तर देतो. एकनाथ शिंदे तुम्हाला कामातून उत्तर देईल, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. बऱ्याच लोकांना मुख्यमंत्री व्हायची स्वप्न पडू लागली आहेत. दिवसा स्वप्न बघू लागले आहेत, पण जनता जनार्दनाच्या हातात आहे, कोणाला बसवायचे आणि कोणाला उडवायचं ते, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात