JOIN US
मराठी बातम्या / देश / ज्ञानवापीच्या सर्वेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, मुस्लिम पक्षाला दणका

ज्ञानवापीच्या सर्वेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, मुस्लिम पक्षाला दणका

सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, सर्व्हेच्या प्रक्रियेबाबत मुस्लिम पक्ष उच्च न्यायालयात जाऊ शकतो. तसंच ज्ञानवापी मशिदीत काय चाललंय असा प्रश्नही सर्वोच्च न्यायालयाने विचारला.

जाहिरात

सुप्रिम कोर्ट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 24 जुलै : सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी मस्जिद परिसरात एएसआयच्या सर्वेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, सर्व्हेच्या प्रक्रियेबाबत मुस्लिम पक्ष उच्च न्यायालयात जाऊ शकतो. तसंच ज्ञानवापी मशिदीत काय चाललंय असा प्रश्नही सर्वोच्च न्यायालयाने विचारला. यावर उत्तर प्रदेश सरकारने सांगितलं की, मशिदीत कोणतेही खोदकाम सुरू नाही. पुढच्या एक आठवड्यापर्यंत काही खोदकाम होणार नाही. फोटोग्राफी आणि रडार इमेजिंगच्या माध्यमातून सर्वे केला जात आहे. एएसआयकडून सांगण्यात आलं की, आम्ही फक्त सर्वेचं काम करत आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सर्वेला स्थगिती देण्यास नकार दिला. सध्या कोणतंही खोदकाम केलं जात नाहीय. फक्त मॅपिंग, इमेजिंग आणि व्हिडीओग्राफीचे काम सुरू आहे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. आणखी एक सीमा, फेसबूक फ्रेंडला भेटायला अंजूने ओलांडली बॉर्डर, पाकिस्तानमध्ये पोहोचली

संबंधित बातम्या

वापाणसीत सोमवारी सकाळी ज्ञानवापी मशिदीचा सर्वे सुरू केला आहे. वाराणसी न्यायालयाच्या निर्णयानंतर मशिदीच्या परिसरात सर्वे करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी ४ महिलांकडून दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना जिल्हाअध्यक्ष डॉक्टर अजय कुमार विश्वेश यांनी ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेला मंजुरी दिली. ४ ऑगस्टला एएसआयला अहवाल द्यायचा आहे. एएसआयने सोमवारी सकाळी ज्ञानवापी परिसरात पोहोचून सर्वेचे काम सुरू केले. २० ते ३० जणांचे पथक परिसराचा सर्वे करत आहे. ज्ञानवापी परिसरात सोमवारी सकाळी मोठ्या संख्येने सर्वे करणारे दाखल झाले. यावेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. मशिदी बाहेर मोठ्या संख्येने लोकांनी गर्दीही केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या