जाहिरात
मराठी बातम्या / देश / आणखी एक सीमा, फेसबूक फ्रेंडला भेटायला अंजूने ओलांडली बॉर्डर, पाकिस्तानमध्ये पोहोचली

आणखी एक सीमा, फेसबूक फ्रेंडला भेटायला अंजूने ओलांडली बॉर्डर, पाकिस्तानमध्ये पोहोचली

प्रेमासाठी भारतातून पाकिस्तानमध्ये गेली अंजू

प्रेमासाठी भारतातून पाकिस्तानमध्ये गेली अंजू

एकीकडे सीमा हैदरचं प्रकरण ताजं असतानाच भारतातूनही एक महिला पाकिस्तानमध्ये गेल्याची माहिती समोर येत आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 23 जुलै : पाकिस्तानी नागरिक सीमा हैदर भारतातला प्रियकर सचिन मीणाला भेटण्यासाठी थेट भारतामध्ये आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेश एटीएस सीमा हैदरची कसून चौकशी करत आहे. एकीकडे सीमा हैदरचं प्रकरण ताजं असतानाच भारतातूनही एक महिला पाकिस्तानमध्ये गेल्याची माहिती समोर येत आहे. फेसबूक मित्र नसरुल्लाहला भेटण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये राहणारी अंजू पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात गेली आहे. नसरुल्लाह हा पहिले शाळेत शिक्षक होता, पण तो सध्या मेडिकल रिप्रेझेनटेटिव्ह म्हणून काम करत आहे. या दोघांनीही आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना भेटलो असल्याचं कबूल केलं आहे, तसंच अंजूने आपण बॉर्डर क्रॉस करून खैबर पख्तूनख्वामध्ये गेलो आहे, असं सांगितलं आहे. सीमा हैदरची चौकशी सुरू दरम्यान भारतामध्ये यूपी एटीएस सीमा हैदरची कसून चौकशी करत आहे. सीमा हैदरने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दया याचिका केली आहे, तसंच आपल्याला चार मुलांसोबत ग्रेटर नोएडामधला आपला साथी सचिनसोबत राहण्याची परवानगी द्या, अशी मागणीही सीमाने केली आहे. ‘मी आणि माझी मुलं भारतासाठी…’, एटीएसच्या चौकशीवेळी सीमा हैदरची नवी चाल? यूपी एटीएसच्या तपासावेळी सीमा आजारी पडली असून तिला ग्रुकोज ड्रीप देण्यात येत असल्याची माहितीही समोर आली आहे. आपल्याविरुद्धच्या बातम्या ऐकल्यामुळे आजारी पडल्याचा दावा सीमाने केला आहे. ‘लोक माझ्याबद्दल चुकीचं का बोलत आहेत? यामुळे दु:ख होतंय. कुणीही एकदाही माझ्याबद्दल चांगलं बोललेलं नाही. मी आणि माझी चार मुलं भारतावरचं ओझं वाढवू, असं मला वाटत नाही. जर मला नागरिकत्व मिळालं, तर मी एक चांगली व्यक्ती बनून दाखवीन, मी विश्वासघात करणार नाही,’ असं सीमा हैदरने एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. सीमा हैदर आणि सचिन मीणा यांच्यामध्ये ऑनलाईन गेम पबजी खेळत असताना मैत्री झाली. या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं, पुढे सीमा पाकिस्तानहून युएई आणि मग तिथून नेपाळमध्ये आली. नेपाळहून सीमाने तिच्या चार मुलांसह अवैधरित्या भारतामध्ये प्रवेश केला आणि ती सचिनसोबत ग्रेटर नोएडामध्ये राहू लागली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात