JOIN US
मराठी बातम्या / देश / karnataka cm : कर्नाटकात आता सिद्धरामय्या सरकार, डीके शिवकुमार होणार उपमुख्यमंत्री!

karnataka cm : कर्नाटकात आता सिद्धरामय्या सरकार, डीके शिवकुमार होणार उपमुख्यमंत्री!

Karnataka Chief Minister : सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे. तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री असणार आहे

जाहिरात

अखेरीस मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांची घोषणा करण्यात आली

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बंगळुर, 18 मे : कर्नाटकमध्ये एक हाती सत्ता खेचून आणल्यानंतर मागील 4 दिवसांपासून मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार याच्या चर्चेचं गुऱ्हाळ सुरू होतं. अखेरीस या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे. तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री असणार आहे, अशी घोषणाच काँग्रेसकडून अखेर करण्यात आली आहे. नव्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा 20 मे रोजी बंगळुरू येथील कांतीरवा स्टेडियम शपथविधी सोहळा पार पडणार आहे. कर्नाटकात काँग्रेसच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर दिल्लीत गेल्या 4 दिवसांपासून बैठका सुरू होत्या. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आधीच दिल्लीला पोहोचले. पण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी मात्र तब्येतीचं कारण देत दिल्लीला येणं टाळलं होतं. पण, आज दोन्ही नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर अखेरीस मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांची घोषणा करण्यात आली आहे. तर किंगमेकर ठरलेले डीके शिवकुमार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे. शिवकुमार सगळ्यात श्रीमंत आमदार डीके शिवकुमार कर्नाटकचे सगळ्यात श्रीमंत आमदार आहेत. निवडणुकीवेळी फॉर्म भरताना शिवकुमार यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली होती. यानुसार त्यांच्याकडे एकूण 1,413 कोटी रुपये आहेत. यामध्ये बँक खाती, जमीन, बॉण्ड्स, प्लॉट, सोनं, हिऱ्यांचे दागिने यांचा समावेश आहे. याशिवाय शिवकुमार यांच्याकडे लक्झरी गाड्याही आहेत. शिवकुमार यांच्या नेटवर्थमध्ये मागच्या 5 वर्षांमध्ये 68 टक्क्यांची वाढ झाली आहे. शिवकुमार यांनी 2018 साली त्यांची संपत्ती 840 कोटी रुपये असल्याचं जाहीर केलं होतं, तेव्हा 2013 च्या तुलनेत ही संपत्ती दुप्पट वाढली होती.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाचे मोठे श्रेय काँग्रेसने ‘भारत जोडो यात्रे’ला दिले आहे. ‘भारत जोडो यात्रा विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी’ या द्वंद्वात राहुल गांधींनी काढलेली पदयात्रा ‘स्पष्ट विजयी’ ठरल्याचे पक्षाने म्हटले आहे. ‘भारत जोडो यात्रा’ पार पडलेल्या 20 विधानसभा मतदारसंघांपैकी काँग्रेसने 15, तर जनता दल (धर्मनिरपेक्ष) 3 आणि भारतीय जनता पक्षाने 2 जागा जिंकल्या. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत या 20 जागांपैकी काँग्रेसला फक्त 5 जागा मिळाल्या होत्या. कर्नाटकचा विजय काँग्रेसचा आत्मविश्वास वाढवणारा आहे. कारण गेल्या वर्षभरात काँग्रेसनं हे दुसरं राज्य भाजपकडून खालसा केलाय. त्यामुळे 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कर्नाटकचा विजय फायदेशीर ठरणार का हाच खरा प्रश्न आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या