JOIN US
मराठी बातम्या / देश / मोबाईल गेमिंगचा 15 वर्षांच्या मुलावर भयानक परिणाम; मानसिक स्थिती बिघडली, झोपेतच करतो ही धक्कादायक कृत्यं

मोबाईल गेमिंगचा 15 वर्षांच्या मुलावर भयानक परिणाम; मानसिक स्थिती बिघडली, झोपेतच करतो ही धक्कादायक कृत्यं

15 वर्षांचा मुलगा झोपेत ‘फायर, फायर’ ओरडतो आणि मोबाईल स्क्रीनवर ऑनलाइन गेम खेळण्याच्या हालचाली करतो. झोपेतही त्याचे हात थरथरत राहतात.

जाहिरात

मोबाईल गेमिंगमुळे बिघडली मानसिक स्थिती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 12 जुलै : ऑनलाइन गेमिंगचे मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतात, असं आपण बऱ्याचदा ऐकलंय. पण, आता राजस्थानमधून एक प्रकरण समोर आलंय. अलवरमधील 15 वर्षांचा मुलगा झोपेत ‘फायर, फायर’ ओरडतो आणि मोबाईल स्क्रीनवर ऑनलाइन गेम खेळण्याच्या हालचाली करतो. झोपेतही त्याचे हात थरथरत राहतात. त्याची अवस्था इतकी वाईट झाली आहे की त्याला काउन्सेलिंग आणि उपचारांसाठी नेण्यात आलंय. हा मुलगा सहा महिने दररोज 15 तास मोबाईल गेम खेळत होता, अशी माहिती समोर आली आहे. या संदर्भात ‘इंडिया टुडे’ने वृत्त दिलंय. PUBG आणि फ्री-फायरसारखे ऑनलाइन गेम तरुणांच्या मानसिक आरोग्यावर कसे दुष्परिणाम करत आहेत, याचं उदाहरण ही घटना आहे. सातवीत शिकणाऱ्या या मुलाचं मानसिक आरोग्य मोबाईल गेमिंगच्या व्यसनामुळे बिघडलं आहे. त्याला फ्री फायर आणि बॅटल रॉयल गेमचं व्यसन जडलं आणि त्याचा परिणाम त्याच्या मानसिक आरोग्यावर आणि संतुलनावर झालाय. त्यामुळे आता त्याला उपचारांसाठी डिसएबिलिटी इन्स्टिट्युशनच्या हॉस्टेलमध्ये दाखल करण्यात आलंय. ना आधार, ना मतदार ओळखपत्र, ना इतर कोणते ओळखपत्र, भारतात या लोकांवर अशी वेळ… या मुलाची आई घरकाम करते, तर वडील रिक्षाचालक आहेत. मोबाईलवर गेम खेळण्याच्या सवयीमुळे मुलाच्या कुटुंबियांची चिंता वाढली आहे. त्याची गेमिंगची सवय थांबवण्यासाठी त्यांनी दोन महिने प्रयत्न केले, पण त्यांनाही न जुमानता तो PUBG सारखे गेम खेळत राहिला. गेमिंगच्या व्यसनामुळे त्याने खाण्या-पिण्याकडेही दुर्लक्ष केलं. तो झोपेत वारंवार ‘फायर-फायर’ बडबड करतो आणि मोबाईल स्क्रीनवर गेम खेळण्याच्या हालचालींची नक्कल करत त्याचे हात थरथरत राहतात. त्याची प्रकृती बिघडल्यानंतर पालकांनी त्याला जयपूर येथील रुग्णालयात नेलं होतं. सध्या त्याला अलवरमधील हॉस्टेलमध्ये ठेवण्यात आलंय. तिथे काउन्सेलर त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत. सायकॅट्रिस्ट आणि डॉक्टरांची एक टीम सध्या मुलाला आवश्यक वैद्यकीय मदत पुरवत आहे. त्यांच्या देखरेखीखाली त्याची स्थिती सुधारण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. डिसएबिलिटी वेलफेअर फाउंडेशनच्या ट्रेनर भवानी शर्मा यांनी ‘आज तक’ला सांगितलं की, PUBG आणि इतर ऑनलाईन गेम जास्त खेळल्यामुळे मुलाची ही अवस्था आहे. काउन्सेलिंगमध्ये मुलाने दिलेल्या माहितीवरून गेमिंग व्यसन त्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करत असल्याचं स्पष्ट झालंय. झोपेत असतानाही मुलाची बोटं अॅक्टिव्ह असतात. तो गेम खेळत असल्याप्रमाणे बोटं हलतात. शरीर थरथरतं आणि काही वेळा तर तो आपले हात घट्ट पकडतो जणू काही मोबाईल फोन धरला आहे. वास्तविकतेशी काहीच संबंध नसल्यासारखा तो वागतो. दरम्यान, हॉस्टेलमध्ये चालू असलेले उपचार आणि काउन्सेलिंग या मुलाचं व्यसन सोडवतील आणि त्याला मानसिकदृष्ट्या सुदृढ बनण्यास मदत करतील, अशी कुटुंबाला आशा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या