मुंबई, 18 जून : आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदारांना आपल्या नातेवाईक आणि जवळच्या मित्रांसोबतदेखील न बोलण्याचा आदेश देण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सुरक्षेत पोलिसांकडून मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. मुंबईपाठोपाठ आता पुण्यातही तशीच परिस्थिती निर्माण होत असल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 24 जून 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. येत्या 5 दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) वर्तवली आहे. देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी काही मिनिटांत वाचा. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात अनोळखी कार घुसली, मोठा अपघात टळला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सुरक्षेत पोलिसांकडून मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राजभवनावर (Raj Bhawan) गेले होते. तिथून परतत असताना धक्कादायक प्रकार घडला. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. शिवसेनेच्या ‘सह्याद्री’वरील बैठकीची Inside Story सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी आमदारांना विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे आमदारांना आपल्या नातेवाईक आणि जवळच्या मित्रांसोबतदेखील न बोलण्याचा आदेश देण्यात आला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. मुंबईपाठोपाठ पुणे कोरोनाच्या विळख्यात! गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा (Coronavirus) विस्फोट पाहायला मिळत होता. मुंबईपाठोपाठ आता पुण्यातही तशीच परिस्थिती निर्माण होत असल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहे. गेल्या आठवड्याभरातच कोरोनाचा दैनंदिन आकडा हा 200 च्या वर पोहोचला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. रुग्णालयातून प्रकाश आमटेंचा फोटो आला समोर डॉ. प्रकाश बाबा आमटे (Dr. Prakash Amte) यांना हेअरी सेल ल्युकेमिया ब्लड कॅन्सरचे (hairy cell leukemia Blood Cancer) निदान झालं आहे. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाली होती. त्यामुळे मागील 10 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. अजूनही संधी गेली नाही! MPSC कडून राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 24 जून 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे, अशी माहिती राज्यसेवा आयोगाकडून देण्यात आली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. ‘पाण्यापासूनही विमान आणि रेल्वे चालवणार’, नितीन गडकरींचा नेमका प्लॅन काय? येत्या काळात पाण्यामधून हायड्रोजन वेगळं काढून त्यावर विमान (Plane) आणि रेल्वे (Railway) चालवणार असं गडकरी यांनी आपली इनोव्हेटिव्ह आयडिया मांडताना म्हटलं. आज अकोल्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना गडकरींनी एक नवीन प्रयोग जनतेसमोर मांडला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. तृतीयपंथीयांचा मोर्चा घुसला थेट मुंबई भाजप कार्यालयात भाजपच्या (BJP) मुंबई येथील मुख्य कार्यालयाबाहेर आज संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास एक अनपेक्षित घटना घडताना दिसली. काही तृतीयपंथीयांनी आज घोषणाबाजी करत थेट भाजप कार्यालयावर मोर्चा काढला. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. राज्यात पावसाचा जोर वाढणार! राज्यात मान्सूनचं (Monsoon Update) आगमन झाल्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये पावसाने अगदी जोरदार हजेरी लावली. मात्र, काही ठिकाणी अजून दर्शनही दिलं नाही. पाऊस लांबल्याने शेतकरी वर्ग चिंतेत शेतीची मशागत आणि पेरणी कधी होणार याच चिंतेत तो दिसत आहे. तर नाशिकसारख्या दुर्गम भागात पावसाळा सुरू होऊनही पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. दरम्यान, पावसाच्या बाबतीत आता एक चांगली बातमी समोर आली आहे. येत्या 5 दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) वर्तवली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. देशभरातील विरोधानंतरही भारतीय सेना ठाम, 2 दिवसांमध्ये सुरू होणार प्रक्रिया लष्करातील भरतीबाबतच्या अग्निपथ अग्निपथ योजनेला देशभरातून (Agnipath Scheme Protest) विरोध सुरू आहे. उत्तर भारतामध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचे लोण आता दक्षिण भारतामध्येही पसरले आहे. रेल्वे सेवेला याचा मोठा फटका बसलाय. या विरोधानंतरही या योजनेच्या अमंलबजावणीवर लष्कर ठाम आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.