Home /News /maharashtra /

'पाण्यापासूनही विमान आणि रेल्वे चालवणार', नितीन गडकरींचा नेमका प्लॅन काय?

'पाण्यापासूनही विमान आणि रेल्वे चालवणार', नितीन गडकरींचा नेमका प्लॅन काय?

नितीन गडकरींनी आज एक नवीन प्रयोग जनतेसमोर मांडला आहे.

सुनिल दवंगे, प्रतिनिधी अहमदनगर, 17 जून : "मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, मी करतो तेच बोलतो आणि बोलतो तेच करतो", असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले. येत्या काळात पाण्यामधून हायड्रोजन वेगळं काढून त्यावर विमान (Plane) आणि रेल्वे (Railway) चालवणार असं गडकरी यांनी आपली इनोव्हेटिव्ह आयडिया मांडताना म्हटलं. आपल्या खात्या व्यतिरिक्त अन्य विषयांचाही गडकरी अभ्यास करत असतात. आज अकोल्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना गडकरींनी एक नवीन प्रयोग जनतेसमोर मांडला आहे. "आजची स्थिती ही गहू स्वस्त, तर ब्रेड महाग आणि टोमॅटो स्वस्त, तर सॉस महाग अशी आहे. जेव्हा गरज होती. तेव्हा ऊसापासून साखर तयार केली. लोक ऊस लावत आहेत. त्यात नफा आहे. आज आपल्या देशात साखर सरपल्स आहे. त्यामुळे येत्या काळात साखरेऐवजी अन्य पदार्थाकडे वळण्याची गरज आहे", असं नितीन गडकरी म्हणाले. "येत्या काळात पाण्यामधून हायड्रोजन वेगळं काढून त्यावर विमान आणि रेल्वे चालवणार असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. अहमदनगरमध्ये पेट्रोलला हद्दपार करा, कार आणि बस इथेनॉलवर चालवा. माझा ट्रॅक्टर बायो सीएनजीवर आहे, आपला शेतकरी अन्नदाता बरोबर ऊर्जादाता बनला पाहिजे", अशी आशा त्यांनी व्यक्त केली. (अजूनही संधी गेली नाही! MPSC कडून राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ) "मागच्या जन्मी जो पाप करतो तो या जन्मी साखर कारखाना काढतो. नाहीतर वर्तमानपत्र चालवतो", अशी मिश्किल टीप्पणी नितीन गडकरी यांनी केली. पश्चिम महाराष्ट्र मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांची शाळा आहे तर मराठवाडा फस्ट क्लासमध्ये येणारी शाळा असल्याचेही ते म्हणाले. 'गावतलं पाणी गावात' "शिर्डी ते नगर महामार्गाचे काम ठप्प आहे. महाराष्ट्रातील हरित लावादाने माती उचलण्याची परवानगी दिली नसल्याने काम कसं करणार? असा प्रश्न आहे. तुम्ही अपिलात जा, आणि सांगा की नितीन गडकरी आणि त्यांचे मंत्रालय फुकटात तलाव बांधून देण्यास तयार आहे", असं नितीन गडकरी म्हणाले. "धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा, गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. नगरजिल्ह्यात 85 टक्के सिंचन झालं तर 100 टक्के प्रश्न सुटतील", असा विश्वास नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.
Published by:Chetan Patil
First published:

Tags: Ahmednagar News, Nitin gadkari

पुढील बातम्या