मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Pune : ब्लड कॅन्सरचं निदान झाल्यानंतर पहिल्यांदाच रुग्णालयातून प्रकाश आमटेंचा फोटो आला समोर

Pune : ब्लड कॅन्सरचं निदान झाल्यानंतर पहिल्यांदाच रुग्णालयातून प्रकाश आमटेंचा फोटो आला समोर

हे वृत्त समोर आल्याच्या 4 दिवसांनी प्रकाश आमटेंचा रुग्णालयातील एक फोटो समोर आला आहे. त्यांचा मुलगा अनिकेत आमटे याने हा फोटो शेअर केला आहे.

हे वृत्त समोर आल्याच्या 4 दिवसांनी प्रकाश आमटेंचा रुग्णालयातील एक फोटो समोर आला आहे. त्यांचा मुलगा अनिकेत आमटे याने हा फोटो शेअर केला आहे.

हे वृत्त समोर आल्याच्या 4 दिवसांनी प्रकाश आमटेंचा रुग्णालयातील एक फोटो समोर आला आहे. त्यांचा मुलगा अनिकेत आमटे याने हा फोटो शेअर केला आहे.

पुणे, 17 जून : महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे (Dr. Prakash Amte) यांना हेअरी सेल ल्युकेमिया ब्लड कॅन्सरचे  (hairy cell leukemia Blood Cancer) निदान झालं आहे. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाली होती. त्यामुळे मागील 10 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे वृत्त समोर येताच अनेकांना धक्का बसला. समाजसेवेचं व्रत घेतलेली व्यक्तीला कोणत्याही आजाराची बाधा होऊ नये आणि सतत तो असंच काम करीत राहावा असंच वाटतं. त्यामुळे जेव्हा प्रकाश आमटेंना कॅन्सर झाल्याचं कळताच अनेकांनी त्यांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी प्रार्थना केली. दरम्यान 4 दिवसांनी प्रकाश आमटेंचा रुग्णालयातील एक फोटो समोर आला आहे. त्यांचा मुलगा अनिकेत आमटे याने वडिलांच्या फेसबुक अकाऊंटवरुन हा फोटो शेअर केला आहे. सध्या प्रकाश आंमटेंची प्रकृती सुधारत असल्याचंही त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

अनिकेत आमटेने पोस्टमध्ये म्हटलं आहे की...

बाबांची तब्येत आज बरी आहे. आज सध्या पुरता डिस्चार्ज मिळाला आहे. 2-3 दिवसांनी चेक अप होईल. परत रक्ताच्या सर्व टेस्ट करतील आणि ब्लड values ठीक असल्यास लवकरच (8-10 दिवसात) किमो थेरपी सुरू करतील. पुढील साधारण महिनाभर ट्रीटमेंट पुण्यातच होणार आहे. बाबांचा आजचा फोटो सोबत जोडला आहे रुमानी सोबतचा. पेशंट कसा असावा याचे आयडीयल उदाहरण आहेत बाबा.

DMH दवाखान्यातील अतिशय आपुलकीने ट्रीटमेंट करणारे डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, मामा मावश्या सर्वांचे आभार. आपण सर्वांच्या शुभेच्छा धीर द्यायला सोबत आहेतच.

अनिकेत आमटे

याशिवाय पोस्टमध्ये त्याने लोक बिरादरी आश्रम शाळेतील दहावीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचं कौतुकही केलं आहे.

बाबा आमटेंचा लोकबिरादरी प्रकल्प -

गडचिरोली जिल्ह्याच्या घनदाट जंगलात अतिदुर्गम अशा भामरागडच्या हेमलकसात लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून लाखो आदिवासींच्या जीवनाला आधार देणाऱ्या सेवेच्या प्रकल्पाला गेल्या डिसेबर महिन्यात 48 वर्ष पूर्ण झाले आहेत. या सेवेने आता 49 व्या वर्षी पदार्पण केले. दिवंगत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटेंच्या प्रेरणेतून उभ्या असलेल्या या प्रकल्पातून डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटेंसह आमटे कुटुंबियांची चौथी पीढी या प्रकल्पातून आरोग्य, शिक्षण, शेती या कार्याच्या माध्यमातून आदिवासींना सेवा देत आहेत.

First published:
top videos

    Tags: Gadchiroli, Prakash amte, Pune