JOIN US
मराठी बातम्या / देश / MBBSची विद्यार्थीनी, शिवरंजनीने घेतलीय बागेश्वर बाबांशी लग्न करण्याची शपथ; कोण आहे ती?

MBBSची विद्यार्थीनी, शिवरंजनीने घेतलीय बागेश्वर बाबांशी लग्न करण्याची शपथ; कोण आहे ती?

धीरेंद्र शास्त्री यांच्यामुळे शिवरंजनी तिवारी सध्या खूप चर्चेत आहे. तिने धीरेंद्र शात्री यांच्याशी लग्न करण्याची घोषणा केली आहे.

जाहिरात

शिवरंजनीने घेतलीय धीरेंद्र शास्त्रींशी लग्न करण्याची शपथ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ, 08 जून : बाबा बागेश्वर धाम सरकार नावाने ओळखले जाणारे धीरेंद्र शास्त्री यांच्यामुळे शिवरंजनी तिवारी सध्या खूप चर्चेत आहे. तिने धीरेंद्र शात्री यांच्याशी लग्न करण्याची घोषणा केली आहे. मध्य प्रदेशमधील या तरुणीला धीरेंद्र शात्री यांच्याशी लग्न करायचं असून, त्यासाठी तिने पदयात्राही काढली आहे. ही शिवरंजनी तिवारी नक्की कोण आहे, हे जाणून घेऊयात. या संदर्भात ‘आज तक’ने वृत्त दिलंय. शिवरंजनी तिवारीला धीरेंद्र शास्त्रीशी लग्न करायचं आहे. यासाठी ती गंगोत्री धामपासून ते बागेश्वर धामपर्यंत पदयात्रा करत नाही. ती 16 जून रोजी बागेश्वर धामला पोहोचेल. 16 जून रोजी बागेश्वर धाममधून ती महत्त्वाची घोषणा करणार असल्याचं तिने म्हटलं आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्याशी भेट झाल्यास ती तिथूनच लाइव्ह अपडेट लोकांना देईन, असंही तिने सांगितलं. बाबा बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शात्री यांच्याशी लग्न करण्याची इच्छा बाळगणारी शिवरंजनी तिवारी मध्य प्रदेशमधल्या सिवनी इथली आहे. ती एमबीबीएसचं शिक्षण घेत आहे. तसंच युट्युबर व भजन गायिका आहे. शिवरंजनीने एका मुलाखतीत सांगितलं की, धीरेंद्र शास्त्री तिचे प्राणनाथ (पती) आहेत आणि ती 2021 पासून त्यांना याच नावाने संबोधते. दुसऱ्या धर्मातल्या मुलांशी करायचं होतं लग्न, आईचा नकार, बहिणींनी उचललं भयानक पाऊल   तिचं कुटुंब जगदगुरू शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद महाराज यांच्या कुटुंबाशी संबंधित आहे. यामुळे घरात सुरुवातीपासून आध्यात्मिक वातावरण राहिलंय, असंही तिने सांगितलं. शिवरंजनीचे वडिल पंडित बैजनाथ तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे मूळ गाव चंदौरीकला (दिघोरी) हे सिवनीजवळ येते. मात्र, शिवरंजनी तिवारी यांचे कुटुंब गेल्या 25 वर्षांपासून हरिद्वारमध्ये वास्तव्यास आहे. शिवरंजनी तिवारीची आई कॅन्सरच्या औषधांमध्ये तज्ज्ञ आहे. सध्या त्या अमेरिकेतील सेंट फ्रान्सिस येथील एका खासगी कंपनीत विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. बैजनाथ तिवारी यांनी मुलगी शिवरंजनी तिवारीच्या पदयात्रेच्या प्रवासाविषयी सांगितलं. तिने 1 मे रोजी गंगोत्री येथून कलश पदयात्रा काढली होती. कडाक्याच्या उन्हातही शिवरंजनी तिवारी दररोज 30 ते 40 किलोमीटरचा प्रवास करत असल्याचे त्यांनी सांगितलं. शिवरंजनी 6 जून रोजी चित्रकूट धाममध्ये पोहोचली. तिच्यासोबत या प्रवासात अनेक ऋषी-मुनीही आहेत. शिवरंजनी तिवारीने सांगितलं की, लहानपणापासूनच तिला आध्यात्माची ओढ आहे. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून ती भजन गात आहे. सध्या ती एमबीबीएसचे शिक्षण घेत असून, 2021 पासून ती पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना फॉलो करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या