जाहिरात
मराठी बातम्या / देश / दुसऱ्या धर्मातल्या मुलांशी करायचं होतं लग्न, आईचा नकार, बहिणींनी उचललं भयानक पाऊल

दुसऱ्या धर्मातल्या मुलांशी करायचं होतं लग्न, आईचा नकार, बहिणींनी उचललं भयानक पाऊल

घरच्यांचा प्रेम विवाहाला नकार, दोन्ही बहिणींनी घेतला टोकाचा निर्णय

घरच्यांचा प्रेम विवाहाला नकार, दोन्ही बहिणींनी घेतला टोकाचा निर्णय

दुसऱ्या धर्मातल्या मुलांशी लग्न न करून दिल्यामुळे दोन बहिणींनी टोकाचं पाऊल उचललं आहे. या दोन्ही बहिणींनी विहिरीमध्ये उडी मारून जीवन संपवलं.

  • -MIN READ Tamil Nadu
  • Last Updated :

त्रिची, 7 जून : दुसऱ्या धर्मातल्या मुलांशी लग्न न करून दिल्यामुळे दोन बहिणींनी टोकाचं पाऊल उचललं आहे. या दोन्ही बहिणींनी विहिरीमध्ये उडी मारून जीवन संपवलं. पोलिसांना विहिरीजवळ दोन मोबाईल मिळाले आहेत. या दोन्ही मुली तामिळनाडूच्या त्रिचीमधल्या वालानादू गावाच्या रहिवासी आहेत. विद्या (वय 21) आणि गायत्री (वय 23) या दोन बहिणींनी विहिरीमध्ये उडी मारली. विद्या आणि गायत्री या दोघी कोईम्बतूरजवळ एका टेक्स्टाईल मिलमध्ये काम करत होत्या. तिकडेच काम करणाऱ्या दोन भावांसोबत या दोघी प्रेमात पडल्या. या दोघांशी लग्न करण्याची इच्छाही विद्या आणि गायत्रीने व्यक्त केली. पण मुलं दुसऱ्या धर्मातली असल्यामुळे कुटुंबाने लग्नाला नकार दिला, यामुळे नाराज झालेल्या बहिणींनी आयुष्य संपवलं. विद्या आणि गायत्रीने आपल्या प्रेमाबद्दल आई-वडिलांना सांगितलं होतं, पण मुलं दुसऱ्या धर्माची असल्यामुळे दोघींचे पालक लग्नासाठी तयार झाले नाहीत. पालकांनी दोन्ही मुलींना समजावलं पण तरीही त्या ऐकल्या नाहीत. मंगळवारी सकाळी दोन्ही बहिणी घरातून बाहेर पडल्या, पण बराच काळ त्या परत आल्या नाहीत. गावातल्या लोकांना विहिरीजवळ दोन मोबाईल फोन आणि मृतदेह तरंगताना दिसले. यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होताच अग्निशमन दलालाही बोलावलं आणि त्यांनी दोन्ही बहिणींचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. विहिरीत उडी मारण्याआधी विद्या आणि गायत्रीने आईला ऑडिओ मेसेज पाठवला. एका बहिणीने हातावर आपलं नाव लिहिलं तर दुसऱ्या बहिणीने हातावर छोट्या भावाचा मोबाईल नंबर लिहिला. ओळख पटावी म्हणून त्यांनी हातावर हे लिहिल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचं पोस्टमॉर्टम केले आहेत. घरच्यांनी लग्नाला नकार दिल्यामुळे मुलींनी हा निर्णय घेतल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी सापडलेल्या मोबाईलचीही चौकशी सुरू आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात