JOIN US
मराठी बातम्या / देश / संजय राऊत यांचा मोदी सरकारला खोचक सवाल, मंत्र्यांनं अफवेमुळे राजीनामा दिला का?

संजय राऊत यांचा मोदी सरकारला खोचक सवाल, मंत्र्यांनं अफवेमुळे राजीनामा दिला का?

केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी राजीनामा दिला आहे. त्या एवढ्या कानाच्या कच्च्या आहेत का?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 सप्टेंबर: कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या तीन विधेयकांना लोकसभेत मंजुरी देण्यात आली आहे. आता ही तिन्ही विधेयकं रविवारी राज्यसभेत मंजुरीसाठी आणली जाणार आहेत. या तीन विधेयकांवरुन एनडीएमध्ये फूट पडल्याचं पाहायला मिळालं आहे. यावरून शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत (Shiv sena MP Sanjay Raut)यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांच्यावर निशाणा साधला आहे. एका मंत्र्यांनं अफवेमुळे राजीनामा दिला का? असा खोचक सवाल देखील संजय राऊत यांनी केला आहे. हेही वाचा…  हा तर शेतकऱ्यांना भांडवलदारांचा ‘गुलाम’ बनण्याचा डाव, राहुल यांचा मोदींवर निशाणा संजय राऊत यांनी सांगितलं की, कृषी विधेयकावरून देशातील काही भागात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. तर काही भागात शांततेच्या मार्गानं आंदोलन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, म्हणतात शेती विधेयकाबाबत अफवा पसरवण्यात येत आहे. मग केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी राजीनामा दिला आहे. त्या एवढ्या कानाच्या कच्च्या आहेत का? असा सवाल संजय राऊत यांनी सभागृहात उपस्थित करत मोदी सरकारला धारेवर धरलं. ‘वन नेशन वन’ मार्केट सांगणारे केंद्र सरकार आता देशात दोन मार्केट तयार करत आहेत. आज कृषी उत्पन्न बाजार समितीवर भांडवलदार ताबा मिळवतील. विधेयकावर फक्त दोन तास चर्चा करता हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. केंद्र सरकारनं तीन विधेयक मंजूर करण्यासाठी एक विशेष अधिवेशन बोलवण्याची आवश्यकता असल्याचंही संजय राऊत यांना यावेळी सांगितलं. शेतकऱ्यांना भांडवलदारांचं ‘गुलाम’ बनण्याचा डाव… दुसरीकडे काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशातील शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवण्याचा मोदी सरकारचा डाव आहे. मात्र, भारतीय जनता मोदी सरकारचा हा डाव कधी यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये ‘किसान विरोधी नरेंद्र मोदी’ (#KisanVirodhiNarendraModi)असा हॅशटॅग वापरला आहे. मोदी सरकारचा कृषीविरोधी ‘काळा कायदा’ देशातील शेतकऱ्यांसाठी घातक आहे. कृषी उत्पन्न बाजार पेठा बंद झाल्यानंतर MSP कसे मिळणार? MSPची हमी मोदी सरकार का देत नाही? असे सवाल देखील राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत.

संबंधित बातम्या

राहुल गांधी यांनी यापूर्वी कृषी विधेयकावरून सरकारवर निशाणा साधला होता. ‘शेतकऱ्यांचा मोदी सरकारवरून विश्वास उडाला आहे. मोदी यांच्या बोलण्यात आणि कृती करण्यात फरक आहे. नोटबंदी, चुकीचा जीएसटी आणि डिझेलवरती प्रचंड कर हे यावरून सिद्ध झालं आहे. कृषी विधेयकामुळे मोदी सरकार आपल्या मित्रांचा व्यापार वाढवणार आणि शेतकऱ्यांच्या रोजी रोटीवर हल्ला करणार आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी ट्वीट करत मोदी सरकारवर टीका केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या