JOIN US
मराठी बातम्या / देश / घराचा गाडा ओढण्यासाठी पतीसोबत फुलं विकते आणि छोटंसं दुकान चालवते सीएम योगी आदित्यनाथांची सख्खी बहीण

घराचा गाडा ओढण्यासाठी पतीसोबत फुलं विकते आणि छोटंसं दुकान चालवते सीएम योगी आदित्यनाथांची सख्खी बहीण

शशी कोणालाही आपण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बहीण असल्याचे सांगत नाहीत

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 एप्रिल : फार कमी जणांना माहिती आहे की देशातील सर्वात मोठं राज्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची सख्खी बहीण घर चालवण्यासाठी फुलं विकते आणि ढाबा चालवते. योगी आदित्यनाथ यांची बहीण शशी आणि तिचे पती उत्तराखंड येथील पौडी गढवाल जिल्ह्यातील कुठार गावात राहतात. या गावात दोघेजण मिळून एक छोटं दुकानही चालवतात. एक वृत्त वाहिनीशी बातचीत करताना शशी म्हणाल्या की, मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बहीण असल्याचे कोणाला सांगत नाही. मला भीती वाटते की यामुळे कोणी शत्रू होईल. यासाठी आम्ही कोणालाच काही सांगत नाही. शशी यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. शशी या योगी यांच्याहून सहा वर्षांनी मोठ्या आहेत. योगी यांची बहीण शशी यांनी सांगितले की, 11 फेब्रुवारी 2017 मध्ये योगींची भेट झाली होती. निवडणुकीसंदर्भात ते आले असताना त्यांची भेट झाली होती. योगी आदित्यनाथ यांचं खरं नाव अजय सिंह बिष्ट आहे. संन्यास घेतल्यानंतर त्यांनी आपलं नाव बदलून योगी आदित्यनाथ ठेवलं होतं. एबीपीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वडिल आनंद सिंह बिष्ट यांचं आज सकाळी निधन झालं. दिल्लीतल्या एम्समध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते 89 वर्षांचे होते. त्यांची किडनी निकामी झाली होती. आज सकाळी साडे दहाच्या सुमारास त्यांनी अंतिम श्वास घेतला. काही दिवसांपूर्वीच त्यांना एअरलिफ्ट करून उत्तराखंडमधून एम्समध्ये हलविण्यात आलं होतं. कोरोनाशी लढाई सुरू असल्याने आपण आपल्या प्रिय वडिलांच्या अंत्यदर्शनालाही जाऊ शकत नाही असं आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. संबंधित-  चोरीच्या संशयाखाली पकडलेला तरुण निघाला कोरोना पॉझिटिव्ह, पोलीस ठाण्यात खळबळ रोजंदारीवर पोट भरणाऱ्या केनियातील भारतीयाने 24000 भुकेल्यांना पुरवले अन्न-धान्य

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या