Home /News /national /

कौतुकास्पद! स्वत: रोजंदारीवर पोट भरणाऱ्या केनियातील भारतीयाने 24000 भुकेल्यांना पुरवले अन्न-धान्य

कौतुकास्पद! स्वत: रोजंदारीवर पोट भरणाऱ्या केनियातील भारतीयाने 24000 भुकेल्यांना पुरवले अन्न-धान्य

पंकज शाह हे व्यवसायाने सफारी ऑपरेटर आहेत. जे केनियात आलेल्यांचे पर्यटन घडवून आणतात. मात्र त्यांच मन खूप मोठं आहे

    नवी दिल्ली, 20 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामुळे लोक घरामध्ये बंद आहेत. रोजंदारीवर जगणाऱ्यांसाठी हा अत्यंत कठीण काळ आहे. अनेकजण आखणी किती दिवस कामाशिवाय राहावं लागणार आहे याचा विचार करीत आहे तर काहींना संसार कसा चालवायचा हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. या कठीण प्रसंगात अनेक भारतीय पुढे येऊन गरजुंची मदत करीत आहेत. काहीजण गरजुंसाठी जेवणाची व्यवस्था करीत आहेत. अशातच एक व्यक्ती पंकज शाह केनियामधील नौरोबी येथील गरजुंना मदत करीत आहे. एका वृद्ध महिलेने बऱ्याच दिवसांपासून काही खाल्ले नव्हते पंकज शाह हे व्यवसायाने सफारी ऑपरेटर आहेत. जे केनियात आलेल्यांचे पर्यटन घडवून आणतात. सध्या लॉकडाऊनच्या काळात गरजुंना किंवा ज्यांच्याकडे खाण्याची सोय नाही अशांना मदत करीत आहेत. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार पंकज कोरोनाच्या संकटात गरीबांना जेवण पुरवित आहे. सध्या ते स्वयंसेवक म्हणून काम करीत आहेत. लॉकडाऊनच्या काळात एक वृद्ध महिलेला तिच्या मुलाने बरेच दिवस जेवण दिले नव्हते. त्यांच्याकडे काही काम नसल्याने मुलगा जेवायला देत नसल्याचे त्यांनी सांगितले. पंकज शाह या महिलेच्या मदतीला धावून गेले. भुकेमुळे लोकांमधील रागाची भावना वाढत आहे पंकज अशा गरजुंसाठी तांदूळ, कणिक, भाजी आणि दुधाची व्यवस्था करुन देत आहे. केनियामध्ये कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण 12 मार्च रोजी समोर आला होता. त्या आठवड्यातच शाळा आणि अनेक कार्यालये बंद करण्यात आले. अशा कठीण प्रसंगात कोणीतरी मदतीसाठी पुढे यायला हवं. त्यांनी आपल्या काही मित्रांनाही या कामात साहाय्य करण्याची विनंती केली. 22 मार्चपासून गरजुंना खाण्याची मदत व्हायरसमुळे बंद असलेली एक स्थानिक शाळा त्यांनी या कामाचं मुख्य केंद्र बनवलं आहे. केनिया एशियन कम्युनिटी ज्याची स्थापना 3 वर्षांपूर्वी झाली होती, त्यांनी पंकजपर्यंत ट्रक भरुन धान्य व भाज्यांची मदत पोहोचवली आहे. हे सामान 3 आठवड्यांपर्यंत त्यांच्याकडे येत होतं. 22 मार्च 2020 पासून गरजुंना जेवण पोहोचवलं जात आहे. आतापर्यंत 24000 पॅकेट्स वाटण्यात आले असून एक पॅकेटमध्ये 2 आठवडे पुरेल इतकं अन्न-धान्य दिलं जात आहे. संबंधित - टाटांचे मोबाइल पेट्रोल पंप लॉकडाऊनमध्ये हिट,पुण्यातील स्टार्टअप देतंय घरपोच इंधन
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या