JOIN US
मराठी बातम्या / देश / चांद्रयान-3 मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या 'रॉकेट वुमन', रितू कारिधाल कोण आहेत?

चांद्रयान-3 मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या 'रॉकेट वुमन', रितू कारिधाल कोण आहेत?

चांद्रयान-3 मध्ये ऑर्बिटर पाठवले जाणार नाहीत. या वेळी त्यासोबत स्वदेशी प्रोपल्शन मॉड्युल पाठवले जात आहे. ते लँडर आणि रोव्हरला चंद्राच्या कक्षेत घेऊन जाईल.

जाहिरात

रॉकेट वुमन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो आज,शुक्रवारी (14 जुलै 2023) महत्वकांक्षी चांद्रयान 3 लाँच करणार आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन तळावरुन चांद्रयान 3 अवकाशाच्या दिशेनं झेपावेल. या मिशनचं नेतृत्व रितू कारिधाल श्रीवास्तव करीत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, रितू कारिधाल यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा आहे? आज आम्ही तुम्हाला या बाबत माहिती देणार आहोत. आजचा दिवस भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. संपूर्ण जगाच्या नजरा भारतावर खिळल्या आहेत. आज भारत श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2:35 मिनिटांनी चांद्रयान-3 लाँच करेल. चांद्रयान-3 च्या लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्युलमध्ये एकूण सहा पेलोड्स जात आहेत. चांद्रयान-3 मध्ये ऑर्बिटर पाठवले जाणार नाहीत. या वेळी त्यासोबत स्वदेशी प्रोपल्शन मॉड्युल पाठवले जात आहे. ते लँडर आणि रोव्हरला चंद्राच्या कक्षेत घेऊन जाईल. यानंतर ते चंद्राभोवती 100 किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत फिरत राहील. त्याचे वजन 2145.01 किलोग्रॅम असेल, त्यापैकी 1696.39 किलो इंधन असेल. म्हणजेच, मॉड्युलचं वास्तविक वजन 448.62 किलो आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘रॉकेट वुमन’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या अंतराळ शास्त्रज्ञ रितू कारिधाल या मिशनचं नेतृत्व करीत आहेत. या महत्त्वाच्या मिशनची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या रितू कारिधाल नेमक्या कोण आहेत, ते जाणून घेऊ. लखनऊ विद्यापीठातून घेतली पदवी रितू यांनी शालेय शिक्षण नवयुग गर्ल्स कॉलेजमधून घेतलं आणि नंतर लखनऊ विद्यापीठातून फिजिक्समध्ये पदवी घेतली. सहा महिने संशोधन केलं, व त्यांनी गेट परीक्षा उत्तीर्ण केली. विज्ञान आणि अवकाश संशोधनाची आवड असल्याने रितू यांनी बेंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्समध्ये प्रवेश घेतला. यानंतर 1997 मध्ये त्यांनी इस्रोमध्ये नोकरीला सुरुवात केली. एरोस्पेसमध्ये पारंगत असलेल्या रितू यांचं करिअर यशांनी भरलेले आहे. त्यांना 2007 मध्ये यंग साइंटिस्ट अवॉर्डही मिळाला आहे. वेगवेगळ्या मोहिमांमध्ये त्यांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे देशातील आघाडीच्या अवकाश शास्त्रज्ञांमध्ये त्यांचे नाव समाविष्ट आहे. त्यांना ‘रॉकेट वुमन’ असंही म्हणतात.

Chandrayaan 3: भारतीयांसाठी महत्वाचा दिवस! चांद्रयान-3 आज अवकाशात झेपावणार, अशी असेल प्रक्षेपणाची टाइमलाइन

संबंधित बातम्या

अनेक मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका रितू यांनी मिशन मंगलयान आणि मिशन चांद्रयान-2 मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांना लहानपणापासूनच अंतराळ आणि अवकाशशास्त्रात रस होता. रितू यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी त्यांच्या कामगिरीइतकीच मोठी आहे. डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यंग साइंटिस्ट अवॉर्ड, मार्स आर्बिटर मिशनसाठी इस्रो टीम अवॉर्ड, एएसआय टीम अवॉर्ड, सोसायटी ऑफ इंडियन एरोस्पेस टेक्नॉलॉजी अँड इंडस्ट्रीजचा एरोस्पेस वुमन अचिव्हमेंट अवॉर्ड असे विविध अवॉर्ड त्यांना मिळालेत. चांद्रयान-3 उतरवण्याची जबाबदारी महिला शास्त्रज्ञ रितू यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. चांद्रयान-3 च्या मिशन डायरेक्टरच्या भूमिकेत रितू दिसणार आहेत. मंगळयान मोहिमेत स्वतःचं कौशल्य दाखविणाऱ्या रितू चांद्रयान-3 सह यशाचे आणखी एक उड्डाण घेणार आहेत. रितू यांच्या या आधीच्या मिशनमधील भूमिका लक्षात घेऊन ही जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. रितू या मंगळयान मिशनच्या डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर होत्या. दरम्यान, आज चांद्रयान-3 मोहिमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. ही मोहीम यशस्वी व्हावी, या साठी अनेकजण प्रार्थनाही करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या