जाहिरात
मराठी बातम्या / देश / Chandrayaan 3 LIVE : काऊंटडाऊन सुरू, थोड्याच वेळात अवकाशात झेपवणार चांद्रयान

Chandrayaan 3 LIVE : काऊंटडाऊन सुरू, थोड्याच वेळात अवकाशात झेपवणार चांद्रयान

चांद्रयान-3 अवकाशात झेपावलं

चांद्रयान-3 अवकाशात झेपावलं

ISRO आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून चांद्रयान-3 चं प्रक्षेपण करेल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 14 जुलै : अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या भारताच्या चांद्रयान मोहिमेची वेळ आता जवळ आली आहे.  भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून चांद्रयान-3 चं प्रक्षेपण करणार आहे. ISRO पुन्हा एकदा इतिहास रचण्यासाठी सज्ज झालं आहे. भारताचं सर्वात वजनदार रॉकेट असलेल्या जिओसिंक्रोनस लॉन्च व्हेईकल मार्क तीनद्वारे चांद्रयान-3 चं लॉन्चिंग होणार आहे. चांद्रयान-3 चा फोकस चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग करण्यावर आहे. अशा प्रकारे सॉफ्ट लँडिंग करणं जर या चांद्रयानाला शक्य झालं तर भारत हा जगातील चौथा देश बनले. ज्या देशाकडे अशा प्रकारे मोहिम करण्याची क्षमता आहे. यामध्ये अमेरिका, रशिया आणि चीन हे तीन देशांनी यापूर्वी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलं आहे.

चांद्रयान-३ मिशनच्या प्रक्षेपणाची टाइमलाइन प्रक्षेपण - चांद्रयान 3 आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी प्रक्षेपित होणार आहे. 2xS200 इग्निशन - रॉकेट इंजिन 0 सेकंदात प्रज्वलित होतील. L110 इग्निशन - L110 इंजिन 108 सेकंदात प्रज्वलित होतील. 2xS200 पृथक्करण - दोन बाजूचे बूस्टर (2xS200) लॉन्च झाल्यानंतर 127 सेकंदानंतर वेगळे होतील. PLF सेपरेशन - पेलोड फेअरिंग 195 सेकंदांनी वेगळं होईल. L110 सेपरेशन - L110 इंजिन 306 सेकंदात वेगळं होतील. C25 इग्निशन - C25 इंजिन 308 सेकंदात प्रज्वलित होतील. C25 शट-ऑफ - C25 इंजिन 954 सेकंदांनी बंद होतील. उपग्रह सेपरेशन - 969 सेकंदात उपग्रह रॉकेटपासून वेगळं होईल. Chandrayan 3 Mission : चांद्रयान 3 मोहिमेआधी इस्रोची टीम बालाजीच्या दर्शनाला, अर्पण केली खास गोष्ट चंद्रापर्यंतचा प्रवास- प्रक्षेपणानंतर मॉड्यूल चंद्रावर पोहोचण्यासाठी सुमारे एक महिना अंतराळात प्रवास करेल. मून लँडिंग - इस्रोने 23-24 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंगची योजना आखली आहे, परंतु तेथील सूर्योदयानुसार त्यात बदल होऊ शकतो. उशीर झाल्यास, इस्रो सप्टेंबरसाठी लँडिंगचं वेळापत्रक बनवू शकतं. लँडर आणि रोव्हर मिशन लाइफ - लँडर आणि रोव्हर केवळ चंद्रावरील एका दिवसासाठी (14 पृथ्वी दिवस) काम करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत, कारण ते रात्रीच्या अति थंडीचा सामना करू शकत नाहीत. त्यामुळे, त्यांना पहाटेच उतरावं लागतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: isro , moon
  • First Published :
जाहिरात
जाहिरात