मुंबई, 04 जून : तुम्ही नोकरीसाठी मुलाखतीला जाताय आणि यावेळी तुमची मुलाखत तुमचा बाॅस नाही, तर रोबोट घेतोय.असं कळलं तर धक्का बसेल की नाही? पण हे खरं आहे. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं महत्त्व वाढतंय. उमेदवारांच्या मुलाखती रोबोट घेतोय. रोबोट एल्गोरिदमच्या मदतीनं लोकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव वाचण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याच्या आवाजावरून त्यांच्यात आत्मविश्वास आहे की नाही याची चाचपणी होतेय. ते खूश आहेत की नाही ते पाहिलं जातंय. रोबोटिक व्हिडिओ असेसमेंट साॅफ्टवेअर कंपनी वापरतेय. एक्सिस बँकचे एचआर प्रमुख राजकमल वेंपती म्हणाले, गेल्या वर्षी दोन हजार कस्टमर सर्विस आॅफिसर्सची भरती 40 हजारापेक्षा जास्त उमेदवारांमधून केली. त्यावेळी अॅप्टिट्युड टेस्टसोबत रोबोट एल्गोरिदम व्हिडिओचीही मदत घेतली होती. देशाची पहिली इंटरनेट कार MG Hector चं बुकिंग सुरू, ‘हे’ आहेत फीचर्स ‘ही’ कंपनी देतेय पुरुष कर्मचाऱ्यांना भर पगारी पॅटर्निटी रजा व्हीबाॅक्सचे सीईओ निर्मल सिंग यांनी नवभारत टाइम्सला सांगितलं की, त्यांनी मायक्रोसाॅफ्टच्या फेस इंडेक्सिंग साॅफ्टवेअरचा एक्सिस बँकेत 2017मध्ये 50 हजार उमेदवारांवर वापर केला होता. साॅफ्टवेअरनं लोकांच्या भावना त्यांच्या हालचाली, आवाज यावरून ओळखल्या होत्या. ते खूश आहेत की घाबरलेत ते कळलं होतं. त्यानुसार उमेदवार निवडले गेले. आता कंपनी या पद्धतीनं पुढे जातायत.
धोकादायक पुलांमुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडी? पाहा रिअॅलिटी चेक रोबोटनं तयार केलं चित्र जगात असे रोबोट आहेत जे जेवण बनवतात, वाढतात, साफसफाई करतात. शास्त्रज्ञांनी असा रोबोट बनवलाय जो चित्र काढतो आणि रंगवतोही. याचं नाव प्रसिद्ध शास्त्रज्ञ एडा लवलेसवर ठेवलं गेलंय. रोबोटचं नाव Ai-Da ठेवलंय. हिला स्त्रीचं रूप दिलंय. ती आपल्या हातानं आणि डोळ्यांनी पेंटिंग बनवते. एडन मेलरनं हा रोबोट बनवलाय. VIDEO: हसल्याच्या रागातून युवकाला लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण