JOIN US
मराठी बातम्या / देश / खोडसाळपणा! महादेवांना दाखवलं मृत, वारसांना द्यायला सांगितली जमीन

खोडसाळपणा! महादेवांना दाखवलं मृत, वारसांना द्यायला सांगितली जमीन

आपण कोणत्याही धर्माच्या देवाचं नाव अत्यंत आदराने घेतो. देवाबद्दल वाईट बोलायलाही घाबरतो आणि हरैया भागात मात्र देवांचे देव मानल्या जाणारा महादेवांनाच मृत दाखवण्यात आलं आहे.

जाहिरात

(बस्तीमधील घटना)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कृष्ण गोपाल द्विवेदी, प्रतिनिधी बस्ती, 21 जुलै : उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे ऐन श्रावणात लाखो भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. आपण कोणत्याही धर्माच्या देवाचं नाव अत्यंत आदराने घेतो. देवाबद्दल वाईट बोलायलाही घाबरतो आणि हरैया भागात मात्र देवांचे देव मानल्या जाणारा महादेवांनाच मृत दाखवण्यात आलं आहे. या घटनेने इंटरनेटवर संतापाची लाट उसळली आहे. हरैया भागातील चकरोडची जमीन महादेवांच्या नावे असल्याचं सांगून त्यांचे वारस पार्वती, गणेश आणि कार्तिकेय यांना ती देण्याची मागणी ऑनलाईन पद्धतीने महसूल विभागाकडे करण्यात आली आहे. हे पत्रक आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतंय. हरैया भागातील अकवारा गावातला हा प्रकार आहे.

जमिनीबाबत मागणी केलेल्या पत्रकात देवी पार्वतींचं वय 99 वर्ष, गणपती बाप्पाचं वय 70 वर्ष आणि भगवान कार्तिकेय यांचं वय 59 वर्ष दाखवण्यात आलं आहे. यावरून गावकरीही प्रचंड संतापले आहेत. तसेच नेटकऱ्यांनीही याविरोधात अपशब्दांचा भडीमार केला आहे. ‘दागिन्यांवर फक्त बायकोचा अधिकार, पती दावा करू शकत नाही’, न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय दरम्यान, ‘हा कोणाचातरी खोडसाळपणा आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल’, असं हरैयाचे उपविभागीय दंडाधिकारी गुलाब चंद्रा यांनी सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या