JOIN US
मराठी बातम्या / देश / 7 वर्षांच्या निष्पाप चिमुरडीसोबत शेजाऱ्याचं धक्कादायक कृत्य, आरोपी जवानाची तरुगांत रवानगी

7 वर्षांच्या निष्पाप चिमुरडीसोबत शेजाऱ्याचं धक्कादायक कृत्य, आरोपी जवानाची तरुगांत रवानगी

7 वर्षांच्या मुलीसोबत धक्कादायक कृत्य घडलं.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सुशांत सोनी, प्रतिनिधी हजारीबाग, 9 एप्रिल : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. झारखंड सशस्त्र पोलीस जवानाने 7 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला आहे. यानंतर पीडितेच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणुसकीला लाजवेल अशी ही घटना, झारखंडच्या हजारीबागमध्ये उघडकीस आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण - सुशील तिर्की असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी जवानाला अटक केली आहे. आरोपी जॅप जवान (jharkhand armed police, jap jawan) हा सध्या गिरिडीह येथे तैनात असून तो रजेवर घरी आला होता. यावेळी ही धक्कादायक घटना घडली. आरोपीने एका 7 वर्षांच्या मुलीसोबत दुष्कर्म केले. सुशील तिर्की हा पीडित मुलीच्या शेजारी भाड्याचे घरात परिवारासोबत राहतो. मुलीचे आई-वडील काही कामानिमित्त बाजारात गेले होते. यादरम्यान संधी मिळताच सुशीलने घरात घुसून मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. यानंतर आई-वडील घरी परतल्यावर मुलीने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले. त्यानंतर पालकांनी मुलीला पोलीस ठाण्यात नेऊन तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपी जवानावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला अटकही करण्यात आली आहे. याप्रकरणी ठाणे प्रभारी उत्तम तिवारी यांनी सांगितले की, 7 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची तक्रार होती. याप्रकरणी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई करून आरोपी जवान याला अटक करण्यात आली. तसेच चौकशीत त्याने आपला गुन्हा मान्य केला आहे. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या