अंजीरच्या पिकामुळे शेतकरी झाला श्रीमंत, 20 बिघा शेतीतून कमावले तब्ब्ल 24 लाख रुपये
सीकर, 1 जुलै : राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील एक शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करून लाखो रुपये कमवीत आहे. मागील चार वर्षांपासून अंजीरची शेती करून या शेतकऱ्याने लाखो रुपये कमावले आहेत. तर शेतातून मिळालेल्या फायद्यातून हा शेतकरी आता आवळा, लिंबू सहित अनेक भाजी आणि फळांचे उत्पादन घेत आहे. राजस्थानच्या सीकर येथील जिल्हा मुख्यालयापासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या रामजीपुरा गावात शेतकरी ताराचंद लांबा हे आधुनिक शेती करत आहेत. शेतकरी ताराचंद लांबा यांनी 4 वर्षांपूर्वी 20 बिघा जमिनीवर 7000 अंजीराची झाडे लावली. आता त्यांचे वार्षिक उत्पन्न 24 लाखांपेक्षा जास्त आहे. शेतकरी ताराचंद लांबा हे सेंद्रिय पद्धतीने आणि ठिबक सिंचनाद्वारे गांडूळ खत तयार करून ही शेती करत आहेत. शेतकरी ताराचंद लांबा यांनी सांगितले की, ते एका नातेवाईकाला भेटायला गेले होते, तेव्हा त्यांच्या शेजारच्या छोट्या शेतात अंजीराची रोपे लावली होती. त्या शेतमालकाकडे जाऊन त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी अंजीर लागवडीची माहिती दिली, त्यानंतर त्यांनी घरी येऊन याबाबत माहिती गोळा केली. अंजीर लागवडीची माहिती घेतल्यानंतर शेतकरी ताराचंद लांबा यांनी बेंगळुरू येथून 7 हजार कलमी संकरित बियाणे मागवले. त्यांनी सांगितले की, बेंगळुरूहून खास हायब्रीड आणण्यासाठी प्रति रोप 400 रुपये खर्च आला. बंगळुरूहून अंजीरची रोपे मागवल्यानंतर शेतकऱ्याने आपल्या 20 बिघा जमिनीत अंजीरची रोप लावली.
ताराचंद म्हणाले की, अंजीराची लागवड सेंद्रिय पद्धतीने करावी, त्यामुळे उत्पादन अधिक चांगले मिळते. अंजीरची लागवड मार्च महिन्यात केली तर लहान रोपांचे नुकसान होण्याची शक्यता फारच कमी असते. तर एका रोपापासून दुसऱ्या रोपातील अंतर 9 फुटांचे असावे. अंजीरच्या रोपाची मुळ ही जमिनीच्या 2 ते 2.50 फूट खाली असावी. बियाणे आणि झाडे लावल्यानंतर 1 वर्षासाठी, रोपाला थेंब-थेंब सिंचनाने पाणी द्यावे आणि त्याची योग्य काळजी घ्यावी. 1 वर्षानंतर झाडावर फळे येऊ लागतात. अंजीरच्या रोपावर जूनपासून अंकुर सुरू होतात, जे पिकतात आणि ऑगस्टमध्ये तयार होतात. ऑगस्ट महिन्यात पिकलेली फळे बाजारात विकली जातात. अंजिराचा हंगाम डिसेंबरपर्यंत चालतो. बाजारात 800 ते 1200 रुपयांपर्यंत अंजीर विकले जाते. या शेतीमध्ये झाडे आणि पाण्याशिवाय कोणताही अनावश्यक खर्च होत नाही. Raksha Bandhan : यंदा रक्षाबंधन नेमके कोणत्या तारखेला? या मुहूर्तावर भावाला बांधा राखी पहिल्या पिकातून शेतकऱ्याने कमावले 24 लाख : शेतकरी ताराचंद लांबा यांनी सांगितले की, एक वर्ष कठोर परिश्रम केल्यानंतर त्यांचे पहिल्या वर्षाचे उत्पन्न 24 लाख रुपये होते. त्यांनी सांगितले की त्यांची शेती आणि फळांचा दर्जा चांगला असल्याने अंजीर फळापासून उत्पादने बनवणाऱ्या एका खाजगी कंपनीने त्यांचे सर्व अंजीर एकत्र खरेदी केले. या कंपनीने त्याच्यासोबत 10 वर्षांसाठी करार केला असून शेतातील 7000 हजार रोपांवर उगवलेल्या अंजीरासाठी दरवर्षी 24 लाख रुपये शेतकऱ्याला देण्यात येतील.