mig 21
जयपूर, 08 मे : राजस्थानच्या हनुमानगढ इथं हवाई दलाचं मिग-21 विमान कोसळून दुर्घटना घडलीय. यामध्ये पायलट सुखरुप वाचले असून दोन ग्रामस्थांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, हनुमानगढ इथं मिग-21 हे हवाई दलाचं विमान कोसळलं. दोन्ही पायटलनी प्रसंगावधान राखत विमानातून उडी मारल्यानं दोघेही बचावले. मात्र यामध्ये दोन ग्रामस्थांचा मृत्यू झाला. A MiG-21 aircraft of the IAF crashed near Suratgarh during a routine training sortie. The pilot ejected safely, sustaining minor injuries. An inquiry has been constituted to ascertain the cause of the accident: Indian Air Force pic.twitter.com/sP37zmo7k0
विमानाने सूरतगढहून उड्डाण केलं होतं. हनुमानगढमधील बहलोल नगर इथं विमान दुर्घटनाग्रस्त झालं. यावेळी पायलट पॅराशूटच्या सहाय्याने खाली उतरले. तर विमान एका घरावर कोसळल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला. Mocha Cyclone impact : उकाड्यापासून सुटका पण पिकांचं नुकसान, पुढचे 4 दिवस पावसाचं धुमशान हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, लढाऊ विमान हनुमानगढ इथं कोसळलं. मिग 21 ट्रेनिंगसाठी निघालं होतं. सकाळी नियमित प्रशिक्षणासाठी सूरतगढमधून विमानाने उड्डाण केलं होतं. पायलटने दुर्घटनेआधी बाहेर पडत स्वत:चा जीव वाचवला. मात्र तिथे असणाऱ्या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचत आहेत. विमान कोसळल्यानंतर घटनास्थळी स्थानिकांनी मोठी गर्दी केली आहे. विमान दुर्घटना कशामुळे झाली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर नेमकी माहिती समजू शकेल. सध्या घटनास्थळी स्थानिक पोलीस दाखल झाले आहेत.