राहुल गांधींनी ट्विट केले की – नोकरी घेतली...जमवलेले पैसेही हडपले...आजाराचा फैलाव रोखू शकले नाही...मात्र ते जनतेला सोनेरी स्वप्न दाखवित राहिले...
नवी दिल्ली, 15 जून : देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटावरुन कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. लॉकडाऊनला अयशस्वी म्हणत राहुल यांनी काही दिवसांपूर्वी सरकारला घेराव घातला होता. महान वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाईन यांच्या विधानाने राहुल यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. देशातील कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येचा आलेख शेअर करीत राहुल यांनी आइन्स्टाईन यांचा विचार लिहिला आहे. ‘लॉकडाऊनमुळे सिद्ध करते, अज्ञानापेक्षा आणखी एक गोष्ट धोकादायक आहे आणि ती म्हणजे अहंकार आहे: अल्बर्ट आइनस्टाइन’ राहुल गांधी देशात कोरोना प्रकरणात सातत्याने केंद्रावर निशाणा साधत आहेत. केंद्रावर कोविड – 19 ची प्रकरणं योग्यप्रकारे हाताळले जात नाही असा आरोप राहुल गांधी करीत आहे. त्यांनी शुक्रवारी एका ट्विटमध्ये लिहिले की, ‘भारत चुकीची शर्यत जिंकण्याच्या मार्गावर आहे.
देशात कोरोनाची 3.32 लाख प्रकरणे, जगात चौथ्या क्रमांकावर भारत लॉकडाऊनच्या चारही टप्प्यांत कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये होणाऱ्या वाढीसंदर्भातही काँग्रेसच्या नेत्याने आलेख शेअर केला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सलग तिसर्या दिवशी भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या 11,000 हून अधिक घटना समोर आल्या आहेत. सोमवारी संसर्ग होण्याचे प्रमाण 3,32,424 वर गेले आहे. हे वाचा- मोदी सरकारचा एक निर्णय चीनला पडणार भारी, होईल मोठं नुकसान शाळा सुरू करण्याबाबत मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता संपादन - मीनल गांगुर्डे