JOIN US
मराठी बातम्या / देश / भयानक! ज्याच्यावर अंत्यसंस्कार केले तो दुसऱ्या दिवशी दारात झाला हजर! चमत्कार की...?

भयानक! ज्याच्यावर अंत्यसंस्कार केले तो दुसऱ्या दिवशी दारात झाला हजर! चमत्कार की...?

त्या व्यक्तीचा देहांत झाला. त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले आणि तीच व्यक्ती दुसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत होऊन समोर आली तर…! अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना कुठल्या भयपटातली किंवा भूताच्या गोष्टीतली नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चंदिगड, 12 मार्च – त्या व्यक्तीचा देहांत झाला. त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले आणि तीच व्यक्ती दुसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत होऊन समोर आली तर…! अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना कुठल्या भयपटातली किंवा भूताच्या गोष्टीतली नाही. हे घडलं आहे पंजाबमध्ये. अशीच एक घटना पंजाबमध्ये घडलेली आहे. एका व्यक्तीला मृत्यूनंतर पुरण्यात आलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती मृत व्यक्ती चक्क घरी परतली. घरातल्या लोकांची काय अवस्था झाली असेल कल्पना करा. ही धक्कादायक घटना पंजाबमधील चीचावतीन भागातून समोर आली आहे. नेमकं काय झालं वाचा. मिळालेल्या माहितीनुसार, ज्याचा मृत्यू झाला असं समजण्यात आलं त्या व्यक्तीचं नाव मोहम्मद असलम आहे. पण मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी जेव्हा असलम त्याच्या घरी परतला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. धक्का, भय, चमत्कार याचा ओघ ओसरल्यानंतर नेमकं हे झालं तरी कसं याचं कोडं उलगडलं. ज्याचा मृत्यू झाला म्हणून पुरण्यात आलं तो असलम नसून दुसरीच कुणीतरी व्यक्ती असल्याचं पुढे स्पष्ट झालं. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद असलम हा प्रचंड व्यसनी आहे. त्याला असलेल्या व्यसनामुळे तो बऱ्याच वेळा घरातून तीन ते चार दिवस गायब असे. कधी–कधी तर तो यापेक्षाही जास्त दिवसानंतर घरी येत असे. त्यांच्या घरच्यांनीसुद्धा त्याचं व्यसन सोडवण्यासाठी मोठा प्रयत्न केला. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतरही तो व्यसनापायी दिवसेंदिवस गायब राहत असे. वाचा - जिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला तिच्यासह आईला X बॉयफ्रेंडनं केलं ठार एका असलम नावाच्या व्यक्तीचा मृतदेह स्थानिक बस स्थानकावर सापडला असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांना कळविण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी असलमच्या अंत्यसंस्काराची तयारी केली आणि तो मृतदेह पुरण्यात आला. या सर्व घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांवर मोठी शोककळा पसरली होती. पण खरं तर ज्या मृत व्यक्तीला असलम समजून पुरण्यात आलं तो असलम नाही तर तो मुहम्मद खालिद होता. स्थानिक तपासानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. दरम्यान, या सर्व घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये आणि आसपासच्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. एकीकडे आपला मुलगा मृत्यूच्या दारातून पुन्हा परत आल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे या घटनेमुळे समाजात भीतीचंही वातावरण निर्माण झालेलं आहे. वाचा - प्रियकरानं प्रायव्हेट VIDEO केला लिक, त्यानंतर अल्पवयीन मुलीनं उचललं टोकाचं पाऊल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या