जिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला तिच्यासह आईला X बॉयफ्रेंडनं केलं ठार

जिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला तिच्यासह आईला X बॉयफ्रेंडनं केलं ठार

गर्लफ्रेंडसह तिच्या आईवर चाकुहल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीत उघडकीस आला आहे. यामध्ये मायलेकीचा जागीच मृत्यू झाला.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 मार्च : दिल्लीतील न्यू  अशोक नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मायलेकीची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. हा प्रकार सोमवारी उघडकीस आला. घरी काम करणाऱ्या मोलकरणीने दरवाजा उघडताच तिला फरशीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह दिसले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी आले आणि त्यांनी चौकशी केली. दोन्ही मृतदेहांवर चाकूचे वार होते. यात मृत महिलेचे नाव सुमिता आणि तिच्या मुलीचे नाव समरिता असं असल्याचं समजते.

प्राथमिक तपास करताना सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आलं. यात दोन संशयित दिसले आहेत. यापैखी एक समरितासोबत लिव्ह इनमध्ये राहणारा गढी इथला तरुण असल्याचं सांगितलं जात आहे. त्याला ताब्यातही घेतलं आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे एकत्र केले आहेत. साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या आहेत. पोलिसांनी खूनाशिवाय इतर कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.

पोलिसांनी सांगितलं की, मूळच्या केरळच्या असलेल्या सुमिता आणि त्यांची मुलगी समरिता गेल्या 20 वर्षांपासून मनसारा अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. 22 वर्षांपूर्वी सुमिता यांच्या पतीचे निधन झाले आहे. होळीच्या आदल्या दिवशी मायलेकींना सुट्टी होती. सोमवारी जेव्हा मोलकरणीने त्यांच्या घराचा दरवाजा उघडला तेव्हा दोघी वेगवेगळ्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यावेळी मोलकरणीने शेजारच्या लोकांना बोलावल्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली.

घटनास्थळी पोलिसांनी तपासणी केल्यानंतर चौकशीही केली. तेव्हा दोघीही शुक्रवारी त्यांच्या कामावर गेल्या होत्या असं समोर आलं. घरात साहित्य विस्कटलेलं होतं त्यामुळे चोरीचा संशयही व्यक्त केला जात आहे. अद्याप हत्येचं कारण समजू शकलेलं नाही. पोलिस अधिक तपास करत आहेत.

याप्रकरणी विक्रांत उर्फ विनय नागर याला राजस्थानमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याच्या चौकशीतून समरितासोबत लिव्ह इननंतर वाद झाल्याचं समोर आलं आहे. समरितासोबत लिव्ह इन मध्ये राहिल्यानंतर गेल्या वर्षीपासून दोघांचे भांडण होत होते. यातून समरिताला सुटका हवी होती म्हणून ती विनयकडे दुर्लक्ष करत होती.

हे वाचा : भयंकर! मानवी हात आणि बोटं त्यानं कढईत शिजत ठेवली; बायकोनं पाहिलं आणि...

दरम्यान, समरिताची दुसऱ्या एका मुलासोबत मैत्री झाली होती. त्यामुळेच विनय चिडला होता असं समरिताच्या मैत्रिणीने सांगितलं. मात्र, भांडण असुनही समरिता विनयला भेटायला जात होती. विनयला अनेकदा समरिता आणि तिची आई आर्थिक मदतही करत होत्या.

हे वाचा : बेडरूममध्ये बॉयफ्रेंडसोबत होती मुलगी, आईला येताना पाहाताच तिनं केलं असं..

First published: March 10, 2020, 8:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या