अहमदाबाद, 11 मार्च : अल्पवयीनं मुलीनं टोकाचा निर्णय घेऊन नैराश्येतून आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. 16 वर्षांच्या या युवतीनं आपलं जीवन संपवल्यानं नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही युवती एका तरुणासोबत रिलेशनमध्ये होती. तिच्या बॉयफेंडनं त्यांच्यातील झालेल्या काही खासगी क्षणांचे व्हिडीओ काढून लिक केल्यानं या तरुणीनं आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. ही घटना छारानगर परिसरात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या अल्पवयीन मुलीनं नैराश्येतून सोमवारी राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बॉयफ्रेंडच्या मित्रानंच त्या दोघांचे व्हिडीओ काढले आणि लिक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर 23 फेब्रुवारी रोजी हा व्हिडीओ लिक झाल्यानंतर मुलीच्या पालकांनी प्रियकर आणि त्याच्या मित्रांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. हे वाचा- क्रूरतेचा कळस! नवजात मुलाला आईनंच फेकलं रस्त्यावर व्हिडीओ लिक झाल्यामुळे अल्पवयीन मुलगी नैराश्येत होती. त्यातूनच सोमवारी संध्याकाळी टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलीस निरीक्षकांनी सांगितलं. दोघांनीही एकमेकांच्या संमतीनं शारीरिक संबंध ठेवले होते. मात्र तिच्या प्रियकरानं याचा व्हिडीओ तयार करून तो आपल्या मित्रांसोबत शेअर केला. या प्रियकराविरोधात आयपीसी आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या तीन मित्रांवर आयटी अॅक्टनुसार व्हिडीओ लिक केल्याप्रकरणी मुलीच्या पालकांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चार पैकी 3 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. तर एक आरोपी अद्यापही फरार आहे. हे वाचा- जिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला तिच्यासह आईला X बॉयफ्रेंडनं केलं ठार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.