JOIN US
मराठी बातम्या / देश / PM Modi : 'माझ्या तिसऱ्या टर्ममध्ये देशाची इकोनॉमी...', पंतप्रधान नरेंद्र मोदींना विजयाची गॅरंटी

PM Modi : 'माझ्या तिसऱ्या टर्ममध्ये देशाची इकोनॉमी...', पंतप्रधान नरेंद्र मोदींना विजयाची गॅरंटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये आपलाच विजय होईल याचा विश्वास व्यक्त केला आहे.

जाहिरात

पंतप्रधान नरेंद्र मोदींना विजयाची गॅरंटी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 26 जुलै : भारतात G20 शिखर परिषदेसाठी दिल्लीतील प्रगती मैदानावर पुनर्विकसित केलेलं आयटीपीओ कॉम्प्लेक्स सज्ज झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या आयटीपीओ कॉम्प्लेक्सचं उद्घाटन करण्यात आलं. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल. मी सांगतो आहे ही मोदीची गॅरंटी आहे, असं वक्तव्य आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रगती मैदानातील कनव्हेंशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. या वास्तूचं नाव भारत मंडपम असं ठेवण्यात आलं आहे, त्यावेळी झालेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधीच विजयाचा दावा केला आहे. तसंच आपल्या तिसऱ्या कार्यकाळात भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरणार आहे, असंही म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

आपल्या देशात काही वेगळ्या विचारधारेचेही लोक आहेत. नकारात्मक विचार करणाऱ्यांची आपल्या देशात कमतरता नाही. भारत मंडपमची निर्मिती रोखण्यासाठीही त्यांनी खूप प्रयत्न केले. कोर्टाच्या फेऱ्याही मारल्या, पण जिथे सत्य असतं तिथे देव असतो यावर माझा विश्वास असल्याचं पंतप्रधान म्हणाले आहेत. भारत वर्ल्ड इकोनॉमीमध्ये 10व्या क्रमांकावर होता जेव्हा मी काम हातात घेतलं. दुसऱ्या टर्ममध्ये आपण पाचव्या क्रमांकाची इकोनॉमी झालो आहोत. तिसऱ्या टर्ममध्ये भारताची इकोनॉमी तिसऱ्या क्रमांकावर असेल, ही मोदींची गॅरंटी आहे. तिसऱ्या टर्ममध्ये भारत आणखी विकसित होईल, तुम्ही तुमची स्वप्न माझ्या तिसऱ्या कार्यकाळात पूर्ण होताना पाहाल,’ असं विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या