शाळा
पीयूष शर्मा, प्रतिनिधी मुरादाबाद, 27 जुलै : उत्तरप्रदेश राज्यातील मुरादाबादमध्ये केंद्रीय विद्यालयाने एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक चुकीवर ते वृक्षारोपण करवुन घेतात. विद्यालयाच्या या उपक्रमामुळे शाळेचे कौतुक होत आहे. दरम्यान, आज गुरुवारी या केंद्रीय विद्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याध्यापकांनी पालकांना महत्त्वाचे आवाहन केले. या पत्रकार परिषदेत प्रामुख्याने नवीन शैक्षणिक धोरणावर चर्चा करण्यात आली. यामध्ये मुख्याध्यापकांनी याठिकाणी आलेल्या पालक आणि पत्रकारांसह उपस्थिताांना सांगितले की, नवीन शैक्षणिक धोरणात अभ्यासाबाबत अनेक बदल करण्यात आले आहेत. यासोबतच नव्या शैक्षणिक धोरणातील बदलासोबतच पालकांनाही स्वतःमध्ये बदल घडवून आणावा लागणार आहे.
मुख्याध्यापक विजेश कुमार म्हणाले की, पालक आपल्या पाल्यांना दबावाखाली ठेवतात. आता मेहनत करा, मुलांना पैसे दिल्याविना शिक्षण करू द्यायचे आहे. यासोबतच तुम्हाला पुढे डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचे आहे, असे दडपण अजिबात टाकू नका. तुम्ही वैद्यकीय क्षेत्रातील असो की समाजाच्या किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील असो, सर्वात आधी तुम्ही समाजाचे चांगले नागरिक बनले पाहिजे. या सर्व क्षेत्रात आपण चांगले नागरिक बनून समाजाला एका नव्या दिशेकडे नेले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. दरम्यान, मुरादाबाद येथील केंद्रीय विद्यालयाचे मुख्याध्यापक विजेश कुमार यांनी रोपे लावण्याचा जो उपक्रम राबविला, एक आगळा वेगळा उपक्रम ठरत आहे. त्यांनी शाळेत हजाराहून अधिक रोपे लावली आहेत. मुलाने चूक केली तर दंड म्हणून एक रोप लावले जाते. बाहेरून प्रमुख पाहुणे आल्यावर एक रोप लावले जाते. शिक्षकाची बदली झाल्यावरही एक रोपटे लावले जाते. तसेच नवीन शिक्षक आल्यावरसुद्धा एक रोप लावले जाते. या शाळेत प्रत्येक प्रसंगी वृक्षारोपण केले जाते. यामुळे आता हा परिषर सर्वांना आकर्षित करीत आहे.