80,000 रुपये खर्चून विद्यार्थ्यांनी ही गाडी बनवली आहे.
हिमांशू जोशी, प्रतिनिधी पिथोरागड, 26 जून : भारतात हळूहळू इलेक्ट्रिक गाड्यांचा बोलबाला वाढू लागला आहे. ज्यामुळे पेट्रोल-डिझेलची बचत तर होतेच, मात्र पर्यावरणाचं संरक्षणही होतं. हाच विचार लक्षात घेऊन उत्तराखंडच्या पिथोरगडमधील विद्यार्थ्यांनी एक इलेक्ट्रिक कार तयार केली आहे. बॅटरीवर चालणारी ही गाडी एकदा चार्ज केली की पाच तास सुस्साट पळू शकते. सीमांत इंजीनियरिंग कॉलेजच्या इलेक्ट्रिकल विभागातील विद्यार्थ्यांनी ही गाडी बनवली आहे. सध्या त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. दरम्यान, गाडीमध्ये एक किलोव्हॅटची बॅटरी बसवण्यात आली असून 100 किलो वजन पेलण्याची तिची क्षमता आहे.
80,000 रुपये खर्चून विद्यार्थ्यांनी ही गाडी बनवली आहे. ती सध्या सिंगल पॅसेंजर असून 45 किलोमीटर प्रतितास वेगाने धावू शकते. या गाडीमुळे पेट्रोल, डिझेलची प्रचंड बचत होणार आहे. IAS Tips: UPSC क्रॅक करण्यासाठी नक्की किती वेळ अभ्यास करावा? खुद्द प्रसिद्ध IAS नं दिल्या टिप्स ही गाडी भविष्यात अतिशय फायदेशीर ठरेल. मात्र अद्याप तिचं काम बाकी आहे. काम पूर्ण झाल्यावर लोक दैनंदिन जीवनात तिचा वापर करू शकतील. या गाडीच्या वापरामुळे प्रदूषणही होणार नाही. शिवाय तिची किंमतही भरभक्कम नसेल. त्यामुळे ती सर्वसामान्यांना परवडेल.