सूरत 16 जून: गुजरातमध्येही कोरनाचा प्रकोप आहे. रुग्णांची संख्या दररज वाढत आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार टाळण्यासाठी काय करणे गरजेचं आहे याची आता सगळ्यांनाच माहिती झाली आहे. सरकारही वारंवार त्याविषयी जनजागृती करत आहे. मात्र लोक कधी काय करतील याचा नेम नाही. कोरोनाचा प्रकोर टाळण्यासाठी सूरतमध्ये लोक तापी नदीत बर्फ टाकत असल्याचं पुढे आलं आहे. ही अंधश्रद्धा असल्याचं सांगत या कृतीवर टीका होत असून असं करणे म्हणजे हद्द असल्याची प्रतिक्रीया सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. गुजरतमधलं मोठं व्यापारी शहर असलेलं सूरत हे तापी नदीच्या काठावर वसलेलं आहे. इथला मुस्लिम समुदाय हा तापीला आपली आई मानतो. बाहेरून रोजगारासाठी सूरतमध्ये आल्यानंतर तापीच्या आर्शीर्वादामुळेच प्रगती झाल्याची त्यांची श्रध्दा आहे. त्यामुळेच त्यानी तापीलाच कोरोना दूर करण्याचं साकडं घातलं. तापीत बर्फ टाकून पाणी थंड केलं तर कोरना व्हायरसचा प्रकोप होणार नाही अशी त्यांची श्रद्धा आहे. मात्र ही अंधश्रद्धा असल्याची टीका होत आहे. हे लोक दररोज नदीच्या पाण्यात 500 किलो बर्फ टाकत. गेली काही दिवस हा उपक्रम सुरू आहे. आठवडाभरापासून अशा प्रकारे बर्फ टाकण्यात येत असून आत्तापर्यंत 3500 किल बर्फ टाकण्यात आला आहे. 155 भारतीय कंपन्यांनी अमेरिकेतील तब्बल सव्वा लाख नागरिकांना दिला रोजगार गेल्या 24 तासांमध्ये गुजरातमध्ये 28 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातल्या मृतांची संख्या 1506 झाली आहे. तर 514 नवीन प्ररणं समोर आली आहेत. तर राज्यातल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 24104 झाली आहे. भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या आकड्यात जास्त वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून नवीन रुग्णांचा आकडा हा 10 हजारांच्या घरात आहे. आजही 10 हजार 667 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 380 जणांचा मृत्यू झाला आहे. यासह भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 3 लाख 43 हजार 91वर पोहचला आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे देशात सध्या 1 लाख 53 हजार 178 सक्रीय रुग्ण असले तरी निरोगी झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. देशात आतापर्यंत 1 लाख 80 हजार 013 रुग्ण निरोगी झाले आहे. तर, एकूण मृतांची संख्या 9 हजार 900 आहे. चीनबरोबर तणाव वाढल्यानंतर भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण, बुडाले 34 हजार कोटी दरम्यान, ताज्या आकडेवारीनुसार, भारताचा रिकव्हरी रेट 52.5% वाढला आहे. यात सर्वात जास्त रिकव्हरी रेट हा महाराष्ट्राचा आहे. त्यचबरोबर आसाम, बिहार, छत्तीसगढ़, हरियाणा, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश, मणिपुर, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तराखंड, पश्चिम बंगाल या राज्यांमध्येही निरोगी रुग्णांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात दररोज 10 हजारहून अधिक रुग्ण निरोगी होत आहेत. त्यामुळं राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा सर्वात जास्त असला तरी, चिंतेची बाब नाही आहे.