JOIN US
मराठी बातम्या / देश / Chandrayaan-3 : आता अवघे काहीच तास शिल्लक; चांद्रयान-3 अंतराळात झेपवणार, प्रक्षेपणाची तालिमही पूर्ण

Chandrayaan-3 : आता अवघे काहीच तास शिल्लक; चांद्रयान-3 अंतराळात झेपवणार, प्रक्षेपणाची तालिमही पूर्ण

चांद्रयान-3 ही भारताची तिसरी चांद्रमोहीम आहे. मंगळवारी प्रक्षेपणाची तालीम झाली. चांद्रयान-3 चे प्रक्षेपण शुक्रवारी दुपारी 2.35 वाजता प्रस्तावित आहे.

जाहिरात

चांद्रयान-3 अंतराळात झेपवणार

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 13 जुलै : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) इतिहासात 14 जुलै 2023 हा महत्त्वाचा दिवस आहे. शुक्रवारी दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील स्पेसपोर्टवरून चांद्रयान-3 उड्डाण करेल. चांद्रयान-3 ही भारताची तिसरी चांद्रमोहीम आहे. मंगळवारी प्रक्षेपणाची तालीम झाली. चांद्रयान-3 चे प्रक्षेपण शुक्रवारी दुपारी 2.35 वाजता प्रस्तावित आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात मोहिमेच्या तयारीचे विश्लेषण पूर्ण झाले आहे. इस्रोच्या बोर्डानेही प्रक्षेपणासाठी परवानगी दिली आहे. मोहिमेअंतर्गत 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवता येईल. या मोहिमेची रंगीत तालिम पूर्ण केल्यावर शास्त्रज्ञांची टीम चांद्रयान-3 चं छोटं मॉडेल घेऊन तिरुपती मंदिरात दर्शनासाठी गेली. ही मोहीम निर्विघ्न पार पडू दे, अशी प्रार्थना त्यांनी देवाकडे केली आहे. भारताच्या चंद्रमोहिमेला आता काहीच तास शिल्लक राहिले आहेत. Chandrayaan-3 : चांद्रयान मोहिमेचं मुंबईशी खास कनेक्शन, ‘या’ कंपनीत तयार झालं यानाचं इंजिन सुमारे 3.84 लाख किमी प्रवास केल्यानंतर, चांद्रयान-3 अंतराळयान 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची अपेक्षा आहे. चांद्रयान-3 अंतराळ यानामध्ये प्रोपल्शन मॉड्यूल (वजन 2,148 किलो), लँडर (1,723.89 किलो) आणि रोव्हर (26 किलो) यांचा समावेश आहे. चांद्रयान मोहिमेचं मुंबईशी खास कनेक्शन - चांद्रयान तीन या मोहिमेसाठी लागणारे इंजिन मुंबईत बनवण्यात आलंय. विक्रोळी येथील गोदरेज कंपनीच्या कारखान्यात त्याची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये तीन प्रमुख आणि 25 लहान इंजिनचा समावेश आहे. ही मोहीम 2019 चांद्रयान-2 मोहिमेचा एक भाग आहे. 2019 मध्ये, लँडर आणि रोव्हर चंद्रावर सॉफ्ट-लँड करू शकले नाहीत, ज्यामुळे मोहीम अयशस्वी झाली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या