नवी दिल्ली, 20 एप्रिल : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) प्रसार रोखण्यासाठी 3 मेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यातच तेलंगना (Telangana) सरकारने 7 मेपर्यंत लॉकडाऊनची मर्यादा वाढवली आहे. अशात राज्यातील सर्व सेवा बंद आहेत. रविवारी तेलंगणा येथील कामारेड्डीमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. बाजारात असताना आजारामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला. बाजारात या व्यक्तीचा मृतदेह उचलण्यासाठी कोणीच पुढे येत नव्हते. त्यावेळी एक सफाई कर्मचाऱ्याने पुढे येऊन या व्यक्तीचा मृतदेह उचलला आणि आपल्या सायकलच्या मागे बांधून 10 किमी लांब सरकारी रुग्णालयात पोहोचला. सांगितले जात आहे की लॉकडाऊनमुळे रुग्णवाहिका उपलब्ध नाही. या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र त्याचा बाजारात मृत्यू झाल्यानंतर त्याचं शव जमिनीवर पडून होते. कोणीही मदतीसाठी पुढे येत नव्हते. अशावेळी हा सफाई कर्मचारी पुढे आला. त्याने आपलं कर्तव्य समजून त्या व्यक्तीचं शव सायकलच्या मागे बांधलं आणि 10 किमी लांब असलेल्या रुग्णालयात त्याचं शव पोहोचवलं. कोरोनाच्या या संकटात अशा माणसांमुळे माणुसकीत टिकून आहे, असं म्हटलं तर अतिशोयोक्ती होणार नाही. तेलंगणामध्ये 7 मेपर्यंत वाढवला लॉकडाऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी राज्यात जारी लॉकडाऊनमध्ये 7 मेपर्यंत वाढ करण्याबाबत रविवारी घोषणा केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते म्हणाले, राज्यात लॉकडाऊन कडक करण्यात आला आहे. संबंधित- घराचा गाडा ओढण्यासाठी छोटंसं दुकान चालवते सीएम योगी आदित्यनाथांची सख्खी बहीण डोंबिवलीत कोरोनाचा तिसरा बळी, सात दिवसांची झुंज अपयशी वडिलांच्या अंत्यदर्शनाला न जाता योगी आदित्यनाथ लढताहेत कोरोनाशी लढाई