JOIN US
मराठी बातम्या / देश / 63 वर्षीय महिला कोरोनाविरुद्ध जिंकली पण दुसऱ्या आजाराने हरवलं, रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर मृत्यू

63 वर्षीय महिला कोरोनाविरुद्ध जिंकली पण दुसऱ्या आजाराने हरवलं, रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर मृत्यू

कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या महिलेचा शेवटचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिचा मृत्यू झाला.

जाहिरात

कोरोना विषाणू मेंदू, पाठीची हाडं, मज्जातंतू आणि स्नायूंसह संपूर्ण मज्जासंस्थेस प्रभावित करतात. डॉक्टर कोरालनिक म्हणतात की, कोव्हिडच्या वेगवेगळ्या मार्गांनी न्यूरोलॉजिकल डिसफंक्शन होऊ शकतं. हा रोग विशेषत: फुफ्फुस, मूत्रपिंड आणि हृदयावर अधिक परिणाम करतो. पण ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्याचा मेंदूवरही परिणाम होतो.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पंचकुला, 19 मे : हरियाणातील पंचकुला जिल्ह्यात एका 63 वर्षीय महिलेनं कोरोनाशी यशस्वी लढा दिला. मंगळवारी तिचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कॅन्सरमुळे मृत्यू झाला. पंचकुलातील सेक्टर 10 मध्ये राहणाऱ्या वृद्ध महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. पंचकुलामध्ये तिला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं होतं. वृद्धेवर तिथं उपचार सुरु होते. याबाबतची माहिती सेक्टर 6 मधील सरकारी रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉक्टर जसजीत कौर यांनी दिली आहे. मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आशा राणी असं आहे. महिलेनं कोरोनाला हरवलं मात्र कॅन्सरविरुद्धचा लढा तिला जिंकता आला नाही. हरियाणात कोरोना रुग्णांची संख्या 942 वर पोहोचली आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून मंगळवारी 15 नवे रुग्ण आढळले. यात चार पोलिसांचाही समावेश आहे. आतापर्यंत हरियाणातील 601 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. हरियाणात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त असल्यानं ही दिलासादायक बाब आहे. हे वाचा : वादळी पावसाने 4 महिन्यांच्या चिमुकलीचा घेतला जीव, 100 फुटांवर उडाला पाळणा फरिदाबाद जिल्ह्यात मंगळवारी रुग्णांची संख्या वाढली. एकाच दिवशी 9 रूग्ण आढळले. यासह जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 159 झाली आहे. आतापर्यंत 77 लोक कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून सध्या 76 अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर जिल्ह्यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. हे वाचा : आपला माणूस ! शेकडो किमी दूर अडकलेल्या लोकांची अंगावर शहारे आणणारी ‘घरवापसी’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या