सांगली 19 मे: अवकाळी पाऊस आणि वादळाने तासगाव तालुक्यातील मतकुनकी येथे चार महिन्याच्या निरागस चिमुकलीचा जीव घेतलाय. तालुक्यातील मतकूनकी वासुंबे सरहद्दीवर शिरातोडे वस्तीवर संजय शिरतोडे यांचे चार खोल्यांच घर आहे. तिथेच ही ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली. वारा येवढा जोराचा होता की मुलीसाठी बांधलेला पाळणा चक्क १०० फुटावर जावून पडला. या घटनेमुळे सगळ्या गावावर शोककळा पसरली आहे.
या घरात त्यांच्या आणखी एका भावाच कुटुंब आणि आई, वडील रहातात. त्यांना पहिल्या दोन जुळ्या मुली आहेत व चार महिन्यांची नंदिनी नावाची तिसरी मुलगी आहे. घराचे छत पत्र्याचे होते, त्याला लोखंडी आडे होते. त्या आड्याला चिमुकलीसाठी पाळणा बांधला होता. काल सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान वादळी पावसाला सुरुवात झाली. पावसाबरोबर जोरदार वादळी वारे वाहू लागले, त्याचवेळी चिमुकली नंदिनी पाळण्यात झोपली होती. अचानक वारे घरात घुसले आणि घराचे छत उडून गेले. त्याच्या बरोबर नंदिनी झोपलेला पाळणा ही उडून शंभर फुटावर जाऊन पडला.
त्या पाळण्यावर पत्र्याचे छत आपटल्याने नंदिनी गंभीर जखमी झाली. तातडीने तिला मिरजेच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र रात्री दहा वाजता तिने प्राण सोडला. चिमुकलीचा मृत्यू मुळे सर्वत्र हळहळ निर्माण झाली आहे. दरम्यान, तलाठी पतंग माने व कल्पना लोणकर यांनी बुधवारी घराचा पंचानामा केला.
हे वाचा -फक्त पॅरासिटामॉल आणि अँटीबायोटिक्सनी ठणठणीत झाले कोरोना रुग्ण; प्रशासनही हैराणआपला माणूस ! शेकडो किमी दूर अडकलेल्या लोकांची अंगावर शहारे आणणारी 'घरवापसी'लॉकडाउनमध्ये गाव हादरलं, दोन लहान मुलांसह विवाहितेचा विहिरीत आढळला मृतदेह!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.