व्हायरल
नवी दिल्ली, 21 एप्रिल : जगभरातील कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घटना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पहायला मिळतात. अनेक लोकांच्या समस्याही ते सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगताना दिसतात. जेणेकरुन त्यांच्या समस्यांचं निरसन लवकर व्हावं. सध्या एका वृद्ध महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतोय जिने पेन्शन गोळा करण्यासाठी चक्क अनवानी पायांनी पायपीट केली. या व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलं असून व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.
ज्येष्ठ नागरिक सूर्या हरिजन या वृद्ध महिलेला तुटलेल्या खुर्चीचा आधार घेऊन अनेक किलोमीटर अनवाणी पायी चालावं लागलं. ओडिशाच्या झारीगाव SBI व्यवस्थापक झारीगाव शाखेत तिची पेन्शन गोळा करण्यासाठी महिलेनं एवढी पायपीट केली. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तुटलेलल्या खुर्चीचा आधार घेत ही वृद्ध महिला रस्त्यावर अनवानी चालत आहे. वय झालेलं असूनही एवढा त्रास घेत तिला बॅंकेत जावं लागलं. तेही एवढ्या दूर अनवानी चालत. तिचा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालतोय.
महिला बॅंकेत पोहोचल्यावर बॅंकेच्या मॅनेजरने सांगतिलं की, “तिची बोटे तुटलेली आहेत, त्यामुळे तिला पैसे काढताना त्रास होत आहे. आम्ही लवकरच समस्या सोडवू.” एनआयने हा व्हिडीओ ट्विटवर शेअर केला आहे.