JOIN US
मराठी बातम्या / देश / Train Accident : ओडिशात पुन्हा रेल्वे अपघात, मालगाडीचे पाच डबे रुळावरून घसरले

Train Accident : ओडिशात पुन्हा रेल्वे अपघात, मालगाडीचे पाच डबे रुळावरून घसरले

बारगढ जिल्ह्यात मेंधापाली इथं मालगाडीला अपघात झाला असून यात पाच डबे रुळावरून घसरले आहेत.

जाहिरात

ओडिशात मालगाडीचा अपघात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बारगढ, 05 जून : ओडिशातील बालासोर दुर्घटनेला तीन दिवस झाल्यानंतर पुन्हा रेल्वेसेवा सुरळीत झाली आहे. दरम्यान, सोमवारी पुन्हा एक रेल्वे अपघात झाल्याची घटना घडलीय. बारगढ जिल्ह्यात मेंधापाली इथं मालगाडीला अपघात झाला असून यात पाच डबे रुळावरून घसरले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जिवित हानी झालेली नाही. इस्ट कोस्ट रेल्वेने या घटनेची माहिती देताना म्हटलं की, ओडिशातील बारगढ जिल्ह्यातल्या मेंधापालीजवळ एका सिमेंट फॅक्ट्रीकडून चालवण्यात येणाऱ्या मालगाडीचे काही डब्बे फॅक्ट्री परिसरात असलेल्या रुळावरून घसरले. यामध्ये रेल्वेचा काहीही संबंध नाही. Train Accident : ट्रेन पटरीवरुन का उतरते? रिपोर्टमधून धक्कादायक खुलासे

संबंधित बातम्या

एक खासगी सिंमेंट कंपनीचा ट्रेन ट्रॅक आहे. कंपनीचा रोलिंग स्टॉक, इंजिन, वॅगन, ट्रेन ट्रॅकही आहे. रेल्वेचा याच्याशी काहीच संबंध नाही. तसंच या दुर्घटनेत कोणतीही जिवीत हानी झालेली नाहीय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या