मुंबई : काही दिवसांपूर्वी ओडिशातील बालासोर येथे तीन रेल्वे गाड्यांचा अपघात झाला. या बातमीने देशाला हादलवून टाकलं आहे. कारण या अपघातात जखमी आणि मृतांची संख्या खूप जास्त आहे. या भीषण अपघातानंतर रेल्वेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तसेच सरकारने देखील या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक तपासणी अहवालानूसार असे सांगितले जात आहे की, रेल्वेला मेनलाइन सिग्नल दिले गेले. यानंतर देखील ट्रेन लूप लाइनमध्ये घुसली, ज्यामुळे ती मालगाडीला धडकली. या अपघातात रेल्वे ही तिच्या रुळावरुन सरकली असल्याचं समोर आलं, ज्यामुळे असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थीत होत आहे की रेल्वे रुळावरुन सरकते तरी कशी? Train Accident : ओडिशात पुन्हा रेल्वे अपघात, मालगाडीचे पाच डबे रुळावरून घसरले 2020-21 या वर्षात सरकारी रेल्वेच्या अहवालात 70 टक्के रेल्वे अपघात रेल्वे रुळावरून घसरल्याने झाल्याचे सांगण्यात आले. मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण दोन टक्क्यांनी अधिक आहे. या अहवालात रेल्वेला आग लागल्यामुळे आणि गाड्यांच्या धडकेमुळे 14 रेल्वे अपघात झाल्याचे सांगण्यात आले. या अहवालात 2020-21 या वर्षात 40 गाड्या रुळावरून घसरल्याचे मूल्यांकन करण्यात आले आहे. यात 33 पॅसेंजर गाड्या आणि सात मालवाहू गाड्या आहेत. यातील ट्रॅकमध्ये बिघाड झाल्याने 17 गाड्या रुळावरून घसरल्या.
एप्रिल 2017 ते 2021 पर्यंत, फेडरल ऑडिटर्सनी गाड्या रुळावरून घसरल्याचा अहवाल सादर केला. या अहवालातील काही निष्कर्ष अस्वस्थ करणारे होते. रेल्वे अपघात का होतात? या अहवालात ट्रॅकच्या भौमितिक आकार आणि संरचनात्मक स्थितीच्या ट्रॅक रेकॉर्डमध्ये महत्त्वपूर्ण त्रुटी असल्याचे म्हटले आहे. तपासणीतील त्रुटी 30 टक्के ते 100 टक्क्यांपर्यंत असल्याचे म्हटले आहे. रुळावरून घसरलेल्या अपघातांच्या 1129 तपास अहवालांचा अभ्यास केल्यावर असे आढळून आले की, रेल्वे रुळावरून घसरण्याच्या अपघातांना 24 घटक जबाबदार आहेत. रुळांची दुरवस्था हे देखील गाड्या रुळावरून घसरण्याचे प्रमुख कारण असल्याचे या अहवालात उघड झाले आहे. तांत्रिक कारणांमुळे गाड्या रुळावरून घसरल्या 180 हून अधिक तांत्रिक कारणांमुळे गाड्या रुळावरून घसरल्याचं अहवालात म्हटलं आहे. त्यापैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त रेल्वे अपघात हे डबे आणि मालगाड्यांमधील दोषांमुळे झाले आहेत. खराब ड्रायव्हिंग आणि ओव्हर स्पीड हे देखील गाड्या रुळावरून घसरण्याची प्रमुख कारणे होती. आता कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून कशी घसरली हे अंतिम तपासानंतरच कळेल.