JOIN US
मराठी बातम्या / देश / लग्नानंतर पत्नीशी शरीर संबंध न ठेवणं ही क्रूरता, पण...उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

लग्नानंतर पत्नीशी शरीर संबंध न ठेवणं ही क्रूरता, पण...उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 जून : ‘लग्नानंतर पतीनं पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणं, हे हिंदू विवाह कायदा 1955 अंतर्गत क्रूरता आहे, परंतु भारतीय दंड संहिता अर्थात आयपीसीच्या कलम 498 A अंतर्गत नाही,’ असं मत कर्नाटक उच्च न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या निकालात व्यक्त केलंय. 2020 मध्ये एका महिलेनं तिचा पती आणि सासरच्या लोकांविरूद्ध केलेला फौजदारी खटला फेटाळताना न्यायालयानं हे मत मांडलं आहे. स्वतःचा पती व सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार करणाऱ्या महिलेचा विवाह हा 18 डिसेंबर 2019 रोजी झाला होता. परंतु ही महिला केवळ 28 दिवस सासरी राहिली, व तिनं सासरचं घर सोडल्यानंतर 5 फेब्रुवारी 2020 रोजी कलम 498A आणि हुंडा कायदा अंतर्गत पोलिसांकडे पती व सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली. तसेच संबंधित महिलेनं कलम 12 (1) (अ) अंतर्गत कौटुंबिक न्यायालयात खटलाही दाखल केला होता. हिंदू विवाह कायद्याच्या आधारावर तिचा विवाह 16 नोव्हेंबर 2022 रोजी रद्द करण्यात आला होता. मात्र, तिनं पती व सासरच्या लोकांच्या विरोधात फौजदारी खटला पुढे चालवण्याचा निर्णय घेतला होता. अखेर संबंधित महिलेच्या पतीनं त्याच्यावर व त्याच्या पालकांविरुद्ध आयपीसी कलम 498A आणि हुंडा बंदी कायदा 1961 च्या कलम 4 अंतर्गत दाखल झालेल्या आरोपपत्राला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. यावर सुनावणीच्या वेळी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवल आहे. प्रेम, अनैतिक संबंध अन् धोका! विवाहित महिलेने तरुणाला घडवली अद्दल; म्हणाली ‘नवऱ्याने टाकलं, आता..’ न्यायालयानं म्हटले की… न्यायमूर्ती एम नागप्रसन्ना यांनी या खटल्यात महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवल आहे. न्यायालयान म्हंटले आहे की, ‘याचिकाकर्त्यावर (संबंधित महिलेचा पती) फक्त एकच आरोप आहे की तो एका विशिष्ट आध्यात्मिक आदेशाचा अनुयायी होता, व प्रेम कधीच भौतिक नसते, तर ते आत्म्यापासून आत्म्याचे असले पाहिजे, यावर त्याचा विश्वास होता. त्याचा स्वतःच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा कधीही हेतू नव्हता, जे हिंदू विवाह कायद्याच्या कलम 12(1)(अ) अंतर्गत विवाह पूर्ण न केल्यामुळे निःसंशयपणे क्रूरतेचे ठरेल. परंतु कलम 498A अंतर्गत ते क्रूरतेच्या कक्षेत येत नाही. त्यामुळे याचिकाकर्ता व त्याच्या पालकांवर फौजदारी कारवाई सुरू ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. अन्यथा ते कायद्याच्या प्रक्रियेचा दुरुपयोग ठरेल.’ दरम्यान, उच्च न्यायालयानं दिलेल्या या निकालाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या