औरंगाबाद, 18 जून : प्रेम, अनैतिक संबंध आणि धोका दिल्याचे एक धक्कादायक प्रकरण बिहारमधील औरंगाबादमधून समोर आले आहे. यामध्ये एका तरुणाने एका विवाहितेसोबत प्रेमाचे नाटक करून 3 वर्षे शारीरिक संबंध ठेवले. नंतर तिच्यापासून सुटका करुन घेण्यासाठी तिचा व्हिडिओ व्हायरल करून बदनामी केली. महिलेच्या पतीने तिला टाकले. मात्र, त्यानंतर महिलेने जे केले त्यामुळे तरुणाला चांगलीच अद्दल घडली आहे. महिला तरुणाला फरफटत घेऊन औरंगाबाद न्यायालयाच्या आवारात पोहोचली. तरुण रडायला लागला आणि हात जोडून माफी मागितली. यावर महिला म्हणाली, रडून कर किंवा हसून, पण लग्न करावे लागेल. याठिकाणी बराच वेळ दोघांमध्ये हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण नबीनगर आणि अंबा ब्लॉकशी संबंधित आहे. नबीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका महिलेचे अंबा पोलीस ठाण्यातील नरहर अंबा येथील अरुणकुमार याच्याशी प्रेमसंबंध होते. या महिलेचा आरोप आहे की, दोघांमध्ये हे संबंध तीन वर्षांपासून गुपचूप सुरू होते. त्यानंतर तरुणाने महिलेपासून सुटका करण्याचा प्रयत्न सुरू केला. यासाठी त्याने महिलेचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केला. हा व्हिडिओ पती आणि दिरापर्यंत पोहोचला, त्यानंतर पतीने तिला सोडले. तरुणाने पाठ फिरवताच महिला भडकली पतीने सोडून दिल्यानंतर ही महिला बेघर झाली. तिने तरुणाला तिच्याशी लग्न करण्याची विनंती केली. तरुणाला याला नकार दिला. यावर महिलेला राग आला. तिने त्या तरुणाला पकडले आणि औरंगाबाद कोर्टात पोहोचली, तिथे एका वकिलाने दोघांच्या लग्नासाठी एक करार-प्रतिज्ञापत्रही तयार केले. या तरुणाने एकत्र राहण्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यास नकार देण्यास सुरुवात केली. यावरून पुन्हा वादावादी सुरू झाली. वाचा - अपघात, घातपात की आणखी काही… राजगडच्या पायथ्याशी MPSC उत्तीर्ण तरुणीसोबत काय घडलं? तरुण म्हणाला, माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा महिलेने दबाव टाकल्यावर तरुणाने आपली चूक मान्य करत माफी मागितली. तो म्हणाला मला सोडा, पण बाई म्हणाली तुझ्यामुळे मला नवऱ्याने सोडून दिलं. आता एका मुलासोबत कुठे जाणार. तू माझ्याशी संबंध ठेवलेस. सर्व काही केले आणि व्हिडिओ व्हायरल केला. आता तुला सोडू शकत नाही. रडून किंवा हसून कर, तुला माझ्याशीच लग्न करावं लागेल. सध्या हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. पोलीस दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.