गोपालगंज, 13 मे : कोरोनाच्या (Coronavirus) संकटात अद्यापही अनेक मजूर मिळेल त्या परिस्थितीत आपल्या घरी परतत आहेत. हाताला काम नाही आणि घर मालकानेही घराबाहेर काढलं तर जायचं कुठं? हा मोठा प्रश्न या मजुरांना सतावत आहे. अशीच एक घटना गोपाळगंज भागात घडली आहे. गोपाळगंजमध्ये दररोज कुचायकोटमधील जलालपूर चेक पोस्टवर हजारो लोक येत आहेत. हे लोक देशातील विविध राज्यांतील आहेत. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक येथे जमा होत आहेत. यामध्येच छपरा येथे राहणारं एक दाम्पत्य आहे. हरियाणाहून आपल्या चार मुलीसह ते पायीच घराकडे निघाले आहेत. जयकुमार राम यांना चार मुली आहेत. रेखा, काजल, ज्योती आणि सुरभी. यांचं वय 2 ते 12 च्या दरम्यान आहे. जयकुमार यांची पत्नी सीमा देवी यांनी सांगितल्यानुसार, लॉकडाऊन लागू झाल्यानंतर जयकुमार याला कामावरुन काढून टाकण्यात आलं. त्यामुळे पोट कसं भरायचं हा मोठा प्रश्न होता. कोरोनाचा कहर असताना घरमालकानाकडून भाडं देण्याची मागणी सुरू होती. मात्र आम्हाला खाण्याची भ्रांत नाही, तर तिथे घरभाडं कसं द्यायचं हा प्रश्न होता. शेवटी घरमालकाने आम्हाला घराबाहेर काढलं. डोक्यावर छत नाही, खायला अन्न नाही…अशावेळी पैसे नसल्याने त्यांना गावी जाण्याशिवाय पर्याय नव्हता. रस्त्यात कोणातरी खायला देत असल्याचं ते सांगतात. मुली लहान आहेत. त्यांना फार चालवत नव्हतं. मात्र चालण्याशिवाय काहीच पर्याय नसल्याचे जयकुमार सांगतो. संबंधित - खळबळजनक, 3 वर्षांपूर्वी केले लेकावर अंत्यसंस्कार लॉकडाऊनमध्ये अचानक पोहचला घरी VIDEO : लॉकडाऊनमध्ये GYM सुरू करण्यासाठी तरुणांनी रस्त्यावर उतरत केलं आंदोलन