नवी दिल्ली, 20 जून : रेल्वे मंत्रालय प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून प्रयत्नात आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिल्ली- मुंबई आणि दिल्ली-हावडा या रेल्वे प्रवासाचे तास कमी होण्याची शक्यता आहे. जवळजवळ 5 तासांनी अंतर कमी होईल. म्हणजे प्रवाशांचा प्रवासाचे 5 तास वाचतील. सध्या दिल्लीहून हावड्याला जायला 17 तास लागतात तर दिल्लीहून मुंबईला पोचायला 15.5 तास लागतात. तेच आता दिल्ली-हावडा अंतर 12 तास आणि दिल्ली- मुंबई अंतर 10 तास लागतील. या प्रस्तावाला मंजुरीसाठी मंत्रिमंडळ समितीकडे पाठवलं आहे. सध्या ट्रेनचा स्पीड 130 प्रति किमी आहे, तो 160 प्रति किमी करणार. दर महिन्याला 2 लाख रुपये कमवण्याचा हिट फाॅर्म्युला, ‘असा’ सुरू करा व्यवसाय मोदी सरकारच्या 100 दिवसांच्या अजेंड्यात 11 प्रस्ताव आहेत. त्यात रेल्वेचाही आहे. त्याचं काम 31 आॅगस्टआधी केलं जाईल. बजेटमध्ये मिळू शकते इन्कम टॅक्सवर सवलत, मोदी सरकारची आहे ‘ही’ योजना रेल्वेचा वाढवणार स्पीड दिल्ली- हावडा मार्ग 1, 525 किमी आहे. त्याचा स्पीड वाढवण्याच्या प्रकल्पाचा खर्च 6, 684 कोटी आहे. दिल्ली-मुंबई मार्ग 1,483 किमी आहे. त्यावर खर्च 6, 806 कोटी रुपये होणार आहे. चार वर्षात हे काम पूर्ण होईल. खिशाला परवडणारा विमान प्रवास ! ‘विस्तारा’च्या आकर्षक ऑफर्स देशात सर्वात मोठं जाळं हे रेल्वेचं आहे. लाखो प्रवासी दरदिवशी रेल्वेतून प्रवास करतात. यावेळी प्रवाशांनी अनेक तक्रारी देखील केलेल्या आहेत. त्यामुळे रेल्वे सेवा सुधारण्यासाठी सरकार हे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. प्रवासादरम्यान खानपानाबद्दल देखील प्रवाशांच्या तक्रारी येतात. त्यावर उपाय म्हणून सरकार हे पाऊल उचलणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी रेल्वे बजेटमध्ये याची घोषणा होणार का? याकडे आता सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. मुंबई लोकलमधून लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. पण, वाढती गर्दी आणि लोकलचा खोळंबा यामुळे मुंबईकर देखील त्रस्त आहेत. रेल्वेसाठी काहीतरी ठोस पावलं उचल अशी मागणी मुंबईकर करत असतात. पण, दरवर्षी सादर होणाऱ्या बजेटमधून मात्र मुंबईला अपेक्षित काही हाती लागत नाही. त्यामुळे यंदाच्या बजेटमधून तरी मुंबईकरांना काही मिळणार का? हे पाहावं लागणार आहे. VIDEO: प्यार के दुश्मन ! मुला-मुलीच्या आईमध्ये प्रेमप्रकरणावरून तुफान राडा